विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी परीश्रम करावे-अनिल लोणकर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : खापा येथिल विद्यार्थी संघटनेतर्फे जिजाऊ विद्या मंदिर येथे विद्यार्थी करीयर गायडन्स प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. संघटनेचे अध्यक्ष अनिल लोणकर यांनी सांगितले की, जर विद्यार्थ्यांना जीवनात यश प्राप्त करून घ्यायचे असेल तर चांगले नागरिक, अधिकारी बनायचे असेल तर जिद्द, चिकाटी व परीश्रम करने आवश्यक आहे. गरिबीत शिक्षण घेऊनही अधिकारी बनता येते. त्यासाठी आमची संघटना निशुल्क स्पर्धा परीक्षा केंद्र उघडून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थ्यांनी खेळातही व अभ्यासातही परिपूर्ण असायला पाहिजे. त्यासाठी या संघटनेचा लाभ जास्तीत जास्त विद्याथीर्नी घेण्याचे आवाहन अनिल लोणकर यांनी केले. माज्या वाढदिवसाच्या दिवशी समाजासाठी माझा चांगला उपयोग होईल हाच माझा जीवनाचा एकमेव उद्देश आहे.

ह्या प्रसंगी मुकेश वासनिक कक्ष अधिकारी, राजेश बोंबार्डे, भिवगडे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानीकिर्ती पिकलमुंडे ग्रा.प. सरपंच खापा, राजेश बोंबार्डे, सोनबा आहाके मंडळ निरीक्षक, कृष्णकांत भवसागर पाणीपुरवठा निरीक्षक, विजयजी वाघमारे, पत्रकार अशोक हुमणे, भिवगडे सर, डां.रुद्रसेन भजनकर, पत्रकार नाना ठवकर, राजेंद्र पिकलमुंडे, उपसरपंचहंसराज ठवकर, कैलास तितरमारे हे उपस्थित होते. ह्याप्रसंगी विद्यार्थ्यांना वाढदिसानिमित्त बक्षीस वितरण करण्यात आले. संचालन नाना ठवकर तर आभार राजेंद्र पिकलमुंडे यांनी मानले. या प्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व विद्यार्थी – अश्विन भोयर, दृप ठवकर, हिमांशू हाडगे, अनिकेत ठवकर, हर्षल राखडे, ईशांत भोयर, क्रिश लोणकर, अंशुल भोयर, मयूरी कोडवते, सिमरन लोणकर, साक्षी गणवीर, शेजल ठवकर, जयश्री भोयर, यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.