माणसांना शंभर वर्षाचा आयुष्य मिळेल-भास्कर पेरे पाटील

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : स्वच्छ पाणी , झाडांची लागवड ,मुलांना चांगलं शिक्षण ,गावात स्वच्छता व वयस्करांचा सांभाळ या पंच सूत्रांचा सरपंचानी गावात काम करावे. गावातील सर्व जनतेची काळजी केली पाहिजे. हल्ली माणसांचे आयुष्य चाळीस वषार्ने कमी झाले. पाच सूत्रांचा वापर केला तर पुन्हा शंभर वर्ष आयुष्य मिळू शकेल. असे प्रतिपादन राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त व आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. हरदोली /झंझाड ता मोहाडी जिल्हा भंडारा येथे ‘सरपंचांनी गावासाठी काय करावं ‘ या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाटोदा (औरंगाबाद ) येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार मधुकर कुकडे होते. मंचावर आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे ,भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को -आॅप बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे ,प्रवक्ता दिनेश घाडगे ,सरपंच सेवा संघाचे पुरुषोत्तम घोगरे , पत्रकार संघांचे अध्यक्ष चेतन भैरम,पंचायत समिती सभापती रितेश वासनिक , जिल्हाध्यक्ष सरपंच संघ यादव मेंगरे हरदोलीचे सरपंच सदाशिव ढेंगे , साकोली सरपंच प्रतिनिधी नैना चांदेवार, छगन बिल्लोरे, प्रल्हाद किमतकर, कमल येरणे, गजानन लांजेवर, बाबुलाल भोयेर, सुभाष गायधने, रिताताई हलमारे, अनिताताइ नलगोपुलवार, महादेव पचघरे,सरपंच सेवा संघाचे तालुका सचिव महेश पटले आदी उपस्थीत होते.

प्रास्ताविकातून ग्रामसेवक गोपाल बुर-डे यांनी गावाचा विकास व कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. पुढे बोलताना ,पेरे पाटील म्हणाले , बाजारात येणारे फळ विषयुक्त आहेत. त्यामुळे गावात फळांची झाड लावा. गावातली वस्तू गावातच खाल्ली पाहिजे. ग्रामसेवकाला त्रास दिल्याने गावाचा विकास थांबतो. सरकारच्या ३००-४०० योजना आहेत. या योजना दाखवायच्या आहेत. लोकांच्या पदरात काही पडत नाही. या योजना वाया चालल्या आहेत अशी त्यांनी सरका-रवर टीका केली. ७५ वर्षाच्या म्हाताºयाला एस. टी. चा प्रवास फुकट देण्यापेक्षा सर्व मुलांना शिक्षण घेण्यासाठी एस. टी. चा प्रवास मोफत द्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. तरुणांनो नोकरीच्या मागे लागू नका. उद्योग करा शेतीत बापाला मदत करा असा सल्ला दिला. पाऊस पडावा व माणूस जगण्यास भरपूर आॅक्सिजन मिळावा यासाठी दर मानसी गावात चार झाडे लावा. गाव सुधारल्या शिवाय देश सुधारणार नाही.

समाजाला सुखी करा. चांगल्या गोष्टींचे अनुकरण करा. गावातील प्रत्येक घटकांनी गाव सुखी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महिलांना लक्ष्मी म्हणतो पण , वागणूक लक्ष्मीची देत नाही. महिलांना सुख -समाधान कसं मिळेल याची काळजी सरपंचांनी घेतली पाहिजे. प्रत्येक गावात चार -दोन लोक बदमाश असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. त्यांना विचारायचे नाही. गावात सेवेचे काम करीत राहा असा सल्ला दिला. ज्या घरात महिलांच्या विचाराने घर चालतो तो घर कर्जबाजारी होवू शकत नाही.आदर्श सरपंच भास्कर पेरे यांनी पंचेचाळीस मिनटात आपण गाव कसं समृध्द करू शकतो यावर व्याख्यानात भर दिला. यावेळी आमदार राजू कारेमोरे ,माजी खासदार मधुकर कुकडे , सरपंच सेवा संघाचे पुरुषोत्तम घोगरे , पंचायत समिती सभापती रितेश वासनिक ,अनिता गिरीपुंजे ,महेश पटले आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी पेरे पाटलांचा ग्रामपंचायतच्या वतीने शाल ,श्रीफळ व मानचिन्ह देवून सरपंच सदाशिव ढेंगे ,उपसरपंच ग्रामसेवक गोपाल बुरडे यांनी सत्कार केला. संचालन सदाशिव ढेंगे यांनी केले. आभार पोलिस पाटील पंढरी झंझाड यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *