राष्ट्रीय जंतूनाशक मोहिम व्यापक प्रमाणात राबवा – पर्वणी पाटील

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : राष्ट्रीय जंतूनाशक मोहिमेअंतर्गत येत्या १० आॅक्टोबर रोजी जंतूनाशक दिनी ०१ ते १९ वर्ष वयोगटातील मुला मुलींना वयोगटानुसार अलबेंडाझोल गोळी खाऊ घालण्यात येणार आहे. ही गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात राबविण्यात येणार आहे. ही मोहिम व्यापक प्रमाणात राबवून शासकीय, खासगी व अनुदानित शाळांमधील मुलामुलींना या गोळ्या देण्यात याव्यात अशा सूचना उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी केल्या. तालुका आरोग्य समितीची बैठक घेण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या. सदर मोहिम १०० टक्के यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी आशा स्वयंसे- विका, आंगणवाडी सेविका व प्रत्येक शाळेतील एक नोडल टिचर यांचे एक दिवशीय प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले. मोहिमेच्या जनजागृती करिता माता बैठका घेणे. प्रत्येक गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढणे तसेच ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, तलाठी यांच्यामार्फत गावात दवंडी व माईकिंग द्वारे जनजागृती करण्याबाबत सूचित केले.

शहरामध्ये सिटी केबल व सिनेमागृह मध्ये जाहिरातीव्दारे व्यापक प्रसिध्दी व जनजागरण, प्रतिष्ठीत नागरीक सरपंच, पोलीस पाटील, वरीष्ठ नागरीक, सर्व अधिकारी व पधाधिकारी यांनी प्रत्येक्षात सहभागी होणे, खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांमार्फत बाहय रुग्ण विभागात येणा-या पालकाना मोहिमेची माहिती देण्यात यावी असे त्यांनी सांगितले. तालुक्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील मुलांमुलींना १०० टक्के जंतनाशकाची गोळी खाऊ घालणे व ०१ वर्ष ते १९ वर्ष वयोगटातील एकही लाभार्थी यापासून वंचीत राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी. १० आॅक्टोंबर २०२२ (सोमवार) रोजी सर्व आंगणवाडी, सर्व शाळा सर्व महाविद्यालयात मुला-मुलींची उपस्थिती १०० टक्के राहील याकरिता शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, यांना सुचीत केले. सभेची सुरुवात डॉ. वेदप्रकाश चौरागडे, तालुका आरोग्य अधिकारी, गोंदिया यांनी करुन मोहिमेबाबत माहिती दिली. श्रीमती पाटील यांनी सभेला मागर्दशन करतांना सदर मोहिम यशस्वी होण्याकरिता उपस्थितांना व ग्रामीण तसेच शहरी सर्व जनतेला सहकायार्चे आवाहन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *