एक जिल्हा एक उत्पादनवर कार्यशाळा संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्हयातील निर्यातदार उद्योजकांना निर्यात वाढविण्याचे दृष्टीने केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाºया विविध योजना, प्रोत्साहने, गुंवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसाय नियत सुलभता व एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर उद्योग संचालनालय व सिडबी यांच्या उद्यामाने हॉटेल शिवम येथे काल दि. २६ सप्टेंबर रोजी संमेलन संपन्न झाले. संमेलन राज्याचे विकास आयुक्त (उद्योग) डॉ. हर्षदिप कांबळे, तसेच जिल्हाचे जिल्हाधिकारी संदिप कदम यांचे मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आले होते. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हयाचे जिल्हाधिकारी संदिप कदम हे होते. या शिवाय नागपूर विभागाचे उद्योग सहसंचालक, गजेन्द्र भारती, सिडबी, नागपूर चे व्यवस्थापक विनय अहिरवार, मंत्री चे नोडल अधिकारी, मुंढे, एउॠउ नागपूरचे व्यवस्थापक बोरकर व सनदी लेखापाल पुजा हरकुट व महाव्यवस्थापक बदर यांची उपस्थीती होती. कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी यांनी दिप प्रज्जवलन करून केले. उद्योग सहसंचालक, भारती साहेब यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्यात वृधी करीता स्थापन केलेल्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय निर्यात प्रचलन समिती विषयी माहिती दिली. तसेच जिल्हयात एक जिल्हा एक उत्पादन अंतर्गत तांदुळ व खनिज उत्पादन यांची निवड झाल्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर सनदी लेखापाल पूजा हुरकट यांनी नियार्ती संबंधी आवश्यक नोंदणी व कागदपत्रे तसेच केंद्र शासनाच्या विविध योजना जसे फडऊळएढ, ॠरळ फकऋवठऊ ॠडछऊ उअफऊ रउऌएटए इत्यादी बद्दल माहिती दिली.

विनय अहिरवार सिडबीच्या विविध योजना व घटकाबद्दल माहिती दिली. मॅत्रीचे नोडल अधिकारी मुंडे यांनी उद्योग स्थापन करतांना येणाºया अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मंत्री पोर्टल बद्दल माहिती दिली. उद्योग उभारतांना व्यापार सुलभीकरण अंतर्गत विविध विभागांच्या आॅनलाईन सेवा बद्यल माहिती दिली. व्यवस्थापक एउॠउ बोरकर यांनी एढडफळ चे विमा संबंधी योजनांची माहिती दिली. जिल्हयातील प्रमुख निर्यातदार पंकज सारडा यांनी निर्यात करण्यात येणाºया अडचणी बदल स्वत:चे अनुभव कथन केले. निर्यात करताना जहाजावर विलंबामुळे विलंब चार्जस भरावे लागतात, जिल्हयात आयसीडी नसल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढत असल्यामुळे शासनाने अनुदान दयावे अशी मागणी केली. तसेच जिल्हयातील निर्यातदारांना परकीय चलन विनिमय करतांना जास्त शुल्क आकारात असल्याची तक्रार केली. जिल्हाधिकारी यांनी आपले अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना देशाचा व राज्याच्या उन्नतीसाठी नियार्तीचे महत्व कथन केले. भंडारा हा कृषी प्रधान जिल्हा असल्यामुळे निर्यात कमी आहे. त्यामुळे कृषी आधारीत उत्पन्नाची निर्यात वाढविण्याची आवश्यकता आहे असे सांगीतले, तांदुळ बरोबरच हळद, मिरची, शिताफळ व पपई यांच्या नियार्तीवर भर देण्यास सांगीतले यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये जागृती करण्याचे प्रतिपादन केले. तसेच जिल्हयातील पितळी व तांबे उद्योजकांनी प्रचलित उत्पादना ऐवजी इलेक्ट्रानीक उद्योगांना लागणाºया सुट्या भागाची निर्यात करण्याची सुचना केली. संमेलनाच्या अखेरीस महाव्यवस्थापक बदर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या विवि योजनांची माहिती देवून जिल्हा निर्यात कृती आराखाडा बदल माहिती देवून आभार प्रदर्शन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *