रोजगार मेळाव्यात ३८१ उमेदवारांची प्राथमिक निवड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी, एल. के. बालखंडे कला व वाणिज्य महाविद्यालय पवनी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी व लाखांदूर आणि संत जगनाडे महाराज (खाजगी) औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी पंडीत दिनदयाळ उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन शिवाजी विज्ञान महाविद्यालय, पवनी याठिकाणी आयोजीत करण्यात आलेले होते. या रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित अनेक कंपन्याकडून ३८१ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. सदर रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उमेश खारोडे, मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूरचे प्राचार्य डॉ. प्रल्हाद हरडे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोदिंया चे सहायक आयुक्त रा. ना. माटे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडाराचे सहायक आयुक्त सुधाकर झळके, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी चे प्राचार्य डॉ.विजय लेपसे, एल. के. बालखंडे कला व वाणिज्य महाविद्यालय पवनी चे प्राचार्य डॉ. संजय नंदागवळी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी व लाखांदूर चे प्राचार्य बी. एन. तुमडाम, संत जगनाडे महाराज (खाजगी) औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनीचे प्राचार्य योगेश बावणकर, एमआयटी शहापूर चे शाहीद शेख, डॉ. संजय रायबोले समन्वयक रोजगार मेळावा विज्ञान महाविद्यालय पवनी, श्री. बी. के. निबांर्ते क.कौ. वि.रो.वउ. मार्गदर्शन अधिकारी भंडारा उपस्थित होते.
सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी आपल्या प्रस्तावीक भाषणामध्ये उद्योजक व उमेदवार यांचा समन्वय एकाच ठिकाणी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येतो. यामाध्यमातून उमेदवारांनी कंपनीत रुजू होवून प्रत्यक्ष अनूभव घ्यावे व त्याचा फायदा उमेदवारांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी नक्कीच होईल असे मार्गदर्शन केले. उमेश खारोडे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी भंडारा यांनी जीवनामध्ये शीस्तीचे पालन करुन आपले जीवन घडवावे असे मार्गदर्शन केले. डॉ. प्रल्हाद हरडे, प्राचार्य मनोहरभाई पटेल अभियांत्रीकी महाविद्यालय शहापूर यांनी आजचे युग हे कौशल्याचे युग असून ज्यांच्याकडे कौशल्य असेल त्यांना रोजगार हमखास मिळेल असे मार्गदर्शन केले. डॉ.विजय लेपसे प्राचार्य शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी यांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. सदर रोजगार मेळाव्यामध्ये स्थानिक जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील नामाकिंत २४ कंपन्यानी त्यांच्याकडील १६०० पेक्षा जास्त पदासाठी मुलाखती घेतल्या व याच दिवशी ३८१ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. सदर रोजगार मेळाव्यामध्ये प्रत्यक्ष १८८२उमेदवार उपस्थित होते आणि त्यांचे तज्ञ मार्गदर्शकाद्वारे उमेदवारांना समुपदेशन करण्यात आले.
तसेच स्वयंरोजगार करणाºया उमेदवारांकरीता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ भंडारा, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊसाठे विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, यांच्या स्टॉलच्या माध्यमातून ३८५ उमेदवारांनी लाभ घेतला. सदर रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेकरीता बी. के. निबांर्ते, एस. के. सय्यद, सोनु उके, विजय कावडे, सुहास बोंदरे, मीरा मांजरेकर, श्रीमती आशा वालदे, श्रीमती प्रिया माकोडे, व्हि. एस. घडोले, के. एस. भंडारी, ए. ए. तरोले, के. पी. लंबोदरी, डॉ. संजय रायबोले, डॉ. किशोर बी. नगरनाईक, डॉ. कृष्णा डी. कारु, डॉ. विश्वनाथ अ. कोडापे, डॉ. अर्जुन एन. टरले, डॉ. अतुल बी. शहारे, झुंझारकुमार बि. रंगारी, भुषन गो. मदनकर तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी, एल. के. बालखंडे कला व वाणिज्य महाविद्यालय पवनी, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी व लाखांदूर आणि संत जगनाडे महाराज (खाजगी) औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी येथील सर्व अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक विद्यार्थी व विद्यार्थींनी तसेच एनएसएस चे स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *