साकोली आरोग्य शिबीरात शेकडोंच्यावर रूग्णांनी घेतला आरोग्य लाभ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अभियानांतर्गत शहरातील मुक्ताई हॉस्पिटलमधे ( २४.सप्टें.) आरोग्य शिबीरात शेकडोंच्यावर रूग्णांनी आरोग्य लाभ घेतला. येथे भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधिक्षक हजर होते हे विशेष. सदर आरोग्य शिबीराचे उदघाटन माजी आमदार राजेश (बाळा) काशिवार यांनी केले. प्रसंगी मान्यवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. डि.के. सोयाम, उपजिल्हा वैद्यकीय अधिक्षक डॉ. संदीपकूमार गजभिये, शिवराम गि-हेपुंजे जि.अ.भाजपा, इंद्रायणी कापगते जि.अ. महिला भाजपा, लखन बर्वे ता.अ.भाजपा, धनवंता राऊत माजी नप.अध्यक्षा, जगन उईके माजी नप. उपाध्यक्ष, अँड. बापूसाहेब अवचटे, महादेव कापगते, डॉ. मारोती बोरकर, रेखा भाजीपाले, भिमावती पटले सरपंचा, लता कापगते, आशा शेंडे, शैलू बोरकर, उषा डोंगरवार, भोजराम कापगते, हरिश लांडगे सरपंच, प्रदीप गोमासे, शंकर हातझाडे, किशोर पोगडे हे हजर होते. स.१० ते सायं. ५ पर्यंत या किशोरवयीन मुली, ६० वर्षावरील ज्येष्ठ, दंतव्याधी रूग्ण व इतर आरोग्य तपासणी आरोग्य शिबीरात डॉ. अजयराव तुमसरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपेश बडवाईक, डॉ. दिपक चंदवाणी, डॉ. तारकेश्वरी लंजे, डॉ. मितुल मिश्रा यांनी आरोग्य सेवा प्रदानकेली. येथे आरोग्य सेवा वैद्यकीय चमु उपजिल्हा रूग्णालयातील औषधी पुरवठा नितीन नाकाडे, रमेश नेटीनकर, परीचारीका रंजीता चचाने, रिगनजांभुळकर, जयश्री बन्सोड मुक्ताई हॉस्पिटलचे अजय मेश्राम, प्रिती गणविर, रोहित गडपायले, पंकज नारनवरे, दिनेश मडकवार, आशुतोष झिंगरे व अन्य सहका-यांनी आरोग्य सेवेत अथक परीश्रम घेतले. सदर मुक्ताई हॉस्पिटलचे हे तब्बल ५० वे आरोग्य शिबीर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवस सेवा पंधरवाड्यात आरोग्य सेवेचे अर्धशतक पूर्ण केल्याचा अभिमान असल्याचे डॉ. अजयराव तुमसरे यांनी बोलतांनी वक्तव्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.