नवरात्र उत्सवासाठी मंडळाच्या पदाधिकाºयांची बैठक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पुढील सप्ताहात सुरू होणाºया नवरात्र उत्सवानिमित्त शांती व सुव्यवस्थेसंबंधी मार्गदर्शक सूचना देण्यासाठी देवीची प्रतिष्ठापना करणाºया मंडळाच्या पदाधिकाºयांच्या बैठकीचे आयोजन पोलीस स्टेशन पवनी येथे करण्यात आले होते. सदर बैठकीत पोलीस निरीक्षक दिलीप गढरी यांनी उत्सवादरम्यान होणाºया गुन्ह्यासंबंधी माहिती देऊन त्यावरील उपाययोजना सांगितल्या. ते म्हणाले शांती व सुव्यवस्था राखण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक नेमावे यातूनदंगाधोपा करू पाहणाºयावर नियंत्रण राहील. जातीय, धर्मीय तेढ निर्माण होईल अशा स्वरूपाच्या कृत्यांवर विशेष लक्ष ठेवावे असे सांगून सायबर सारखे गुन्हे होऊ नये यासाठी सजग असण्याचे आव्हानही ठाणेदार गढरी यांनी केले. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक आशिष चिलांगे म्हणाले कार्यक्रमात होत असलेली गर्दी टाळून शांततेत कार्यक्रम पार पाडावेत असे सांगितले. दरम्यान संशयास्पद अनोळखी व्यक्ती आढळल्यास पोलिसांना सूचना द्याव्यात तसेच रात्री १० वाजेनंतर कार्यक्रम बंद करून शांती सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे असे देखील चिलांगे म्हणाले. बैठकीची अध्यक्षता ठाणेदार दिलीप गढरी यांनी भूषविली. कार्यक्रमाचे संचालन खुपिया हेडे यांनी केले. याप्रसंगी पवनी शहर व ग्रामीण क्षेत्रातून मंडळाचे शेकडो पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *