प्रशासकिय इमारतीतील कार्यालयांना द्यावा लागणार मेंटनन्स खर्च, अन्यथा कार्यालय सील करणार – पर्वणी पाटील

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया येथील जयस्तंभ चौक जवळील प्रशासकीय इमारतीत गोंदिया शहर इतरत्र जवळ जवळ सर्व शासकिय कार्यालय आलेले आहेत. हे सर्व कार्यलये शहरात इतरत्र भाड्याच्या रूम मध्ये होते. ३० जुलै २०१९ ला या इमारतीचे लोकार्पण झाले असून तेव्हा पासुन प्रशासकिय इमारतीत एक एक करून शहरातील हे भाड्याने असलेले कार्यालय या प्रशासकिय इमारतीत येवु लागले यामुळे लोकांना आपल्या कामाकरीता शहरात इतरत्र भटकंती करावी लागत होती. ती या प्रशासकिय इमारती मुळे बंद झाली. आता बहुतांश सर्व शासकिय कार्यालये एकाच ठिकाणी आल्यामुळे जनतेला सोयीचे झालेले आहे. पण कोट्यवधी रुपए खर्च करून तयार केलेली ही इमारतीला लागणा-या मेन्टेंन्स खर्चाकडे येथे आलेल्या सर्व प्रशासकिय कार्यालयांनी दुर्लक्ष केल्यामुळे इमारतीत स्वच्छता गृहात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या बाबतची तक्रार उपविभागीय अधिकारी यांच्यापर्यंत जनतेकडुन केल्या गेल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी येथील असलेल्या सर्व शासकिय कार्यालयांना डिमांड नोटीस बजावुन प्रत्येक महिण्याचे एक हजार रुपये या प्रमाणे त्यांच्या झालेल्या कायमयार्देचे पैसे मेन्टनेंस खर्च म्हणुन उपविभागीय कार्यालयात जमा करवायाबाबतचे एक नोटीस आधी बजावण्याचे आले आहे. दुसरे नोटीस पण देण्यात आले आहे. त्यांना दिलेल्या तारखेपर्यंत या कार्यालयांनी मेन्टेंन्स खर्चची रक्कम जमा न केल्याय या कार्यालयांना सील करण्यात येणार असल्याची तंबी उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांनी दिली आहे. प्रशासकिय इमारतीचे खर्च हे या परिसरातील सायकल स्टॅण्ड, हॉटेल कॅन्टीन, झेरॉक्स दुकाने यांच्याकडुन येणा-या पैश्यातुन तसेच इमारतीतील कार्यालयाकडुन वषार्साठी मिळणा-या १२ हजार या पैश्यातुन केली जाणार असल्याचे ही त्यांनी याप्रसंगी सांगितले. या पैश्यातुन इमारतीचे स्वच्छता गृहापासुन तर इतर सोयी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *