पैशाची चोरी करणाºया आरोपीस २४ तासात अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मोहाडी येथील गांधी चौकातील इलेक्ट्रिक दुकानातुन नगदी २० हजार रूपयांची चोरी करणाºया आरोपीला भंडारा स्थागुशाच्या अधिकाºयांनी अवघ्या २४ तासांत अटक करून त्याच्या ताब्यातुन चोरी केलेली रक्कम २० हजार रुपये जप्त केले. मोहाडी येथील गांधी चौकात माणिकचंद गभने यांचे इलेक्ट्रीकचे दुकान असुन २५ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या दुकानात एक गुलाबी शर्ट घातलेला अंदाजे २५ वर्ष वयाचा एक अनोळखी इसम मोटर पंप खरेदी करण्याकरीता आला. त्याने दुकानदाराकडे एचपी ची ईलेक्ट्रीक मोटर व इतर साहित्याची मागणी केल्याने दुकानदार गभने हे सामान काढण्याकरिता दुकानाच्या वरच्या मजल्यावर गेले असता सदर अनोळखी इसमाने सुना मोका पाहुन दुकानातील कॅश काऊंटर मधील नगदी २० हजार रुपये चोरून नेले.ही गोष्ट लक्षात येताच दुकानदार गभणे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला. सदर प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. जयवंत चव्हान यांनी एक पथक तयार करुन गन्ह्याचा छडा लावण्याचे निर्देश दिले.

स्थागुशाचेसपोनि. नितीनचंद्र राजकुमार,स.फौ. सुधिर मडामे, पो.ना.अंकोश पुराम, पोशि. सुमेध रामटेके यांनी सदर प्रकरणाचा बारीक अभ्यास करून ् मिळालेल्या सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे स्थागुशाचे पोउपनि. विवेक राऊत यांनी संशयीत आरोपीची ओळख पटवुन सपोनि. नितीनचंद्र राजकुमार यांना माहिती दिली.् त्याआधारे तपास पथकाने संशयीतआरोपी नामे अमीरउल अब्दुल शेख वय ३२ वर्ष रा.भीमनगर वार्डन ४ इसासनी हिंगणा नागपूर याला शिताफीने ताब्यात घेवुन त्याची विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातुन चोरी केलेले नगदी २० हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली अ‍ॅक्टीव्हा मोपेड दुचाकी वाहन किंमत ३० हजार रुपये असा एकुण ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीला पुढील कारवाईकरीता पोलीस स्टेशन मोहाडी यांच्या ताब्यात देण्यात आले असुन मोहाडी पोस्टे. पोनि. देशपांडे हे पुढील तपास करीत आहेत. सदर कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. जयवंत चव्हाण,सपोनि.नितीनचंद्र राजकुमार, स.फौ. सुधिर मडामे, पो.ना. अंकोश पुराम, पोशि. सुमेध रामटेके यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *