दुचाकीची धडक, उपचारा दरम्यान बालकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : रात्री जेवणानंतर फिरायला गेलेल्या रुयाड येथील चौघांना चुकीच्या बाजूने भरधाव येणाºया दुचाकीने जबर धडक देऊन गंभीर जखमी केले. यात वतन कुंदन वासनिक वय ११ वर्ष या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. यातील आरोपी दुचाकीस्वाराचे नाव अतुल मोहरकर वय ३२ वर्ष असून तो बाम्हणी(चौ.) येथील रहिवाशी आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रुयाड येथील प्रमोद राजू वासनिक वय ३० वर्ष, कुंदन विजय वासनिक वय ३५ वर्ष, वतन कुंदन वासनिक वय ११ वर्ष व सुरेश अंकुश ईटणकर वय ११ वर्ष जेवणानंतर रविवारला रात्री ९ वाजे दरम्यान पंचभाई राईस मिलकडून परत गावाकडे येत असतांना विरुद्ध बाजूने येणारी दुचाकी क्रमांक एमएच- ३६ डब्ल्यू १११ चे चालक नामे अतुल मोहरकर वय ३८ वर्ष राह. बामणी याने बेजबाबदारपणे चूकीच्या बाजूला येऊन जबर धडक दिली. यात चौघे जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असताना उपचारादरम्यान वतन कुंदन वासनिक वय ११ वर्षे या चिमुरड्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारीवरून पवनी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपासात घेतला आहे. ठाणेदार दिलीप गढरी यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील राऊत, पोलीस हवालदार पठाण अधिक तपास करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *