१५७ गावांचा भार प्रभारी तहसिलदारावर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : तालुक्यात एकूण १५७ गावांचा समावेश असून देखील येथे नवीन तहसीलदाराची नियुक्ती झाली नसल्याने प्रभारी तहसीलदाराच्या खांद्यावर भार आला आहे. परिणामी जनतेच्या कामांचा खोळंबा होत असून पवनीचे नवीन तहसीलदार कोण? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तत्कालीन तहसीलदार नीलिमा रंगारी यांची बदली होऊन आज दोन महिन्यांचा काळ लोटत असला तरी येथे नियमित अधिकाºयाची नियुक्ती करण्यात आली नाही. पवनी तालुका महसुलासाठी महत्वाचे समजल्या जाते. गौणखनिज उत्पादनासाठी प्रसिध्द असलेल्या तालुक्यात नियमित तहसीलदाराचे पद रिक्त असल्याने शासनाच्या महसुलला लाखो रुपयांचा चुना दररोज लागत आहे.

रेतीसोबत मुरूम, माती उत्खनन नित्याचीच बाब झाली आहे. याकडे महसूल प्रशासन लक्ष ठेऊन असले तरी चोरट्या मागार्ने गौनखनिजांची वाहतूक भरमसाठ होत आहे. तहसीलदाराची कमी असल्याने अनेक प्रशासकीय कामांचा खोळंबा होत असून अनियमितता आली आहे. यासंबंधी शासनप्रशासनाने लक्ष देऊन त्वरित तहसीलदार नियुक्तीची मागणी जनतेनी केली आहे.पवनी तहसीलमध्ये असलेल्या मान्यताप्राप्त कर्मचारी संख्येत तलाठी संख्या ४० असून प्रत्यक्षात २३ आहेत तर १७ रिक्त गेली नाही. तालुक्यातील अनेक गावच्या कोतवालांची पदे भरण्यात आली नाही. इतर तालुक्यातील आहेत. लिपिकांची संख्या २४ असून प्रत्यक्षात १५ आहेत तर ९ रिक्त आहेत. चपराशांची ३ पदे रिक्त असून अजूनही भरल्या कोतवालांची पदे भरण्यात आली मात्र पवनी तालुका वाट पाहत आहे. पाणी कुठे मुरते हे कळत नाही.

विद्यार्थ्यांना माराव्या लागतात चकरा

इयत्ता १२ वी व १० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी तहसील कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. वेळेत काम होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. हिरमुसलेल्या अवस्थेत विद्यार्थ्यांना गावखेड्यातून ये-जा करावे लागते. अधिकारी नसल्याने कर्मचारी सुस्तावले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन सुसुत्रता आणण्याची आवश्यकता असल्याचे जनतेत बोलल्या जाते.

खाजगी सेतू केंद्रावर लूट!

पूर्वी शासनाकडून कार्यालयातील सेतू केंद्राची निविदा प्रक्रिया होत असे. परिणामी राज्यातील सेतू केंद्र चालविताना जनतेच्या कामाची वाजवी दरात सोय होत असे. दरम्यान ही केंद्रे बंद असल्यामुळे खाजगी सेतुवाल्यांची चंगळ आहे. येणाºया ग्राहकांकडून मनमर्जीने लूट केली जाते. सदर प्रकार विद्यार्थी व सामान्य जनतेच्या अंगलट आला असून कामे करायची कशी असा प्रश्न आहे?

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.