अल्पवयीन दुचाकी वाहन चालकांवर कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा:- जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेच्या अधिकाºयांनी भंडारा शहरातील शास्त्री चौक परिसरात धोकादायक स्थितीत वाहन चालविणाºया अल्पवयीन दुचाकी वाहन चालकावर कारवाई करीत पाच दुचाकी जप्त केल्या. यावेळी वाहन चालकांसह मालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी,अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्या आदेशानुसार भंडारा पोलीस निरीक्षक सुभाष बारसे ,जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भुषण कोळी यांच्या पथकाने आज दि.२७ सप्टेंबर रोजी शहरातील लाल बहादुर शास्त्री चौक परीसरात धोकादायक रित्या वाहन चालविणाठया अल्पवयीन वाहन चालकाविरोधात मोहिम राबविली. त्या मोहिमेत मो. सा. क्र. एम. एच. ३६ यु ०३५९-वाहन चालक तुषार राजु सेलोकर, वाहन मालक-राजु हागरू सेलोकर, एम. एच. ३६ ए. जे. ५५२३वाहन चालक-राजीव राजेश मेश्राम , वाहन मालक- राजेश दसाराम मेश्राम एम. एच. ४९ एए ४९०४ -चालक मोनु संतोष पाठक , वाहन मालक-संतोष फत्तुजी पाठक ,एम. एच. ३६ ए. डी. ४४५६- चालक-कल्की राजु वाघमारे, वाहन मालक – राजु राकेश वाघमारे व एम. एच. ३६ ए. एच. ३४४८- चालक मयूर आदेश कनोजे , वाहन मालक – प्रमोद अमृत कुंभरे अशा एकुण ०५ दुचाकीवरकारवाई करीत वाहने जप्त केली. तसेच अल्पवयीन मुलांना चालविण्यास देणाºया पालकांविरोधात पो. स्टे. भंडारा येथे कलम १८४,१९९ (अ) (१) मोटार वाहन कायद्यान्वये ५ गुन्हे नोंद करण्यात आले आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक लोहित मतानी ,अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, यांचे मार्गदर्शनात वाहतुक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भुषण कोळी, वाहतुक नियंत्रण शाखा, भंडारा व त्याचे पथकातील पोलीस हवालदार निलेश ननीर, पोलीस हवालदार सुनिल गजभिये, पोलीस हवालदार मुकेश गायकवाड, पोलीस अंमलदार शिवाजी गिते यांनी केली

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *