खड्डयामुळे अनेकांचा मृत्यू तर काहींना आले कायम अपंगत्व

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा वरठी मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे हे खड्डे आणखी किती जीवांची बळी घेणार? असा प्रश्न निर्माण होत आहे. सदर रस्त्यावरील खड्डयाकडे खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे सहित इतर लोकप्रतिनिधी यांचे कुठलेही लक्ष नसल्याने त्यांना खड्डेबाबत जाग कधी येणार? असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. सदर रस्त्यावरील खड्डयामुळे मोठया प्रमाणात अपघात होत असून अपघातात अनेकांना मरण आले आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. भंडारा-वरठी हा अत्यंत महत्वपूर्ण रस्ता आहे. सनμलॅग कारखाना, अदानी कारखाना, मध्यप्रदेश छत्तीसगड राज्याकडे जाणा-या प्रमुख मार्ग आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्याच्या नावाने ओळख असलेल्या भंडारा रोड या रेल्वेस्थानकाकडे याच रस्त्याने वर्दळ सुरु असते. मात्र भंडारा ते वरठी या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. सदर रस्ता अत्यंत अरुंद असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले दिसून येतात. या खड्डयामुळे सातत्याने अपघात होत असतात. अपघातात कित्येक प्रवाशी मृत्युमुखी पडले तर अनेकांना कायम अपंगत्व आले आहे. सदर रस्ता आणखी किती बळी घेणारयाबाबतच्या आता प्रवाशांना चिंता वाटायला लागली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे पूर्णपणे कधीच बांधकाम झाले नाही. कधी दोन किलोमीटर तर कधी एक तर अर्धा किलोमीटर अशा प्रकारे रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यातही रस्त्यावर खड्डे पडले तात्पुरते ठिगळ लावले जाते. थोडासा वर्दळीनंतर रस्ता जशाचा तसा होतो. नुकतेच दोन मुलांसोबत जात असलेल्या वडिलांचा रस्त्यावरील खड्डयामुळे अपघात होऊन पूर्णत: चेंदामेंदा झाला.

पोलिसांना शरीराचे अवयव पावडयाने गोळा करावे लागले. लोकांना खड्डयामुळे आपले जीव गमवावे लागत आहे. रस्त्याची पार दुरावस्था झाली असून खासदार आमदार व लोकप्रतिनिधीसहित प्रशासनाचे याकडे कुठलेही लक्ष नाही. सदर रस्ता अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. रेल्वे स्थानकाकडे बस, आॅटो, दुचाकी, चार चाकीने प्रवाशी प्रवास करतात. येथून सनμलॅग, अदानी कारखान्यात जाणाºया व रेती तस्करी करणारी मोठ-मोठी भीमकाय वाहनाची रात्रंदिवस वर्दळ सुरू असते. अशा या अरुंद व खड्डेमय रस्त्यामुळे सातत्याने आधी आई व नंतर अपघातात वडील गेल्याने मुले ही पोरकी झाली. असे अनेक अपघात होत असतात. त्यामुळे रस्त्याची रुंदीकरण करून रस्त्याचे पूर्णपणे बांधकाम

आमदार-खासदार कधी लक्ष देणार?

सध्या केंद्रात भाजपची सत्ता आहे व भाजपचे खासदार सुनील मेंढे हे भंडारा येथे राहतात. राज्यात भाजपा शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेना समर्थित आमदार नरेंद्र भोंडेकर हे भंडारा येथे राहतात. शिवाय तुमसर विधान सभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे हे तर वरठीतच राहतात. या तिन्ही खासदार आमदारांचा भंडारा, वरठी, तुमसर रस्त्यासोबत नेहमी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे संबंध येत असतो. मात्र सदर रस्त्यावरील खड्डे त्यांना दिसत नाही का? आणि दिसत असतील तर रस्त्याचे पूर्ण बांधकाम का होत नाही. काही महिन्यापूर्वी आ. राजू कारेमोरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. यावर गडकरी यांनी सदर रस्ता नॅशनल हायवेत रूपांतर केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र रस्ता कधी बनेल हे कुणाला माहित नाही. प्रवाशाच्या जीवाशी आणखी किती दिवस खेळणार? असा प्रश्न उपस्थित व्हायला लागला आहे.

दाभ्यापासून रस्त्याची दुरावस्था भंडारा-

वरठी हा खरं पाहता तर अत्यंत अरुंद रस्ता आहे. सदर रस्त्यावर ठिक-ि ठकाणी खड्डे पडले असून रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. यात दाभा मोड पासून वरठी पर्यंत रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. येथे ‘रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता’ हे कळायला मार्ग नाही. या मार्गावर वाहन चालवतांना चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. यात छोट्या वाहनांना तर मोठी अडचण होते.

दोन वर्षात ३६ अपघात भंडारा-

वरठी मार्ग रस्ता अतिशय निरुंद व खड्डेमय आहे. सदर रस्त्यावर व परिस- रात मागील २ वर्षात एकुण ३६ अपघात झाले. यात १८ लोकांचा मृत्यू झाला तर ३९ प्रवाशी गंभीर जखमी झाले. ही तर नोंद घेतलेल्या अपघाताची संख्या आहे. खरा आकडा यापेक्षा किती तरी जास्त असूनही शासन व प्रशासन अद्याप मुंग गिळुन गप्प आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *