कैद्यांनी पुस्तकांच्या माध्यमातून जीवन आदर्श बनवावे- शैलेजा वाघ

भंडारा:- प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुन्हा माणसाच्या हातून घडत असल्याने त्यांना बंंदिजनाचे जीवन जगावे लागत आहे. म्हणून भारतीय संविधान, ग्रामगीता, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवन चारित्र्यावरिल पुस्तकांचे कैद्यांनी वाचन करावे. कारण एक पुस्तकच माणसाच्या विचारात बदल घडवून आणू शकते. म्हणून जिल्हा कारागृहात असलेल्या वाचनालयातील पुस्तकांचा पुरेपूर वापर करून स्वत:च्या जिवनात परिवर्तन करून आदर्श नागरिक बनवावे असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ यांनी केले. त्या समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्युकेशन भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विलास केजरकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान केल्यानंतर भंडारा जिल्हा कारागृहात बंदिस्ताना वाचण्यासाठी तेथील वाचनालयाला विविध पुस्तकांचे वितरण तसेच शासकीय अंध विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होत्या. त्यावेळी जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ, जिल्हा कारागृह अधिक्षक अमृत आगाशे, पत्रकार समीर नवाज, शासकीय अंध विद्यालयाचे अधिक्षक व्ही. व्ही. उमप, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे संस्थापक सचिव अविल बोरकर, पतंजलि योग समितीचे जिल्हा प्रभारी रमेश खोब्रागडे, पतंजलि योग समितीचे जिल्हा महामंत्री यशवंत बिरे, विलास केजरकर, सामाजिक कार्यकर्त्यावर्षा मानकानी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध ठिकाणी रोपट्यांचे वाटप व शासकीय अंध विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी रक्तदान व वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. व सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर यांच्या भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर नवाज यांनी केले. तर उपस्थितांचे आभार यशवंत बिरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विठ्ठल हटवार, अभय गहाणे, रविशंकर वाघाडे, जोशी विठोले, सत्यम कोरे, क्रिश खोबरे, ध्रुव बारस्कर, अविनाश डोंगरवार, आकाश गेडाम, फराह शेख, अथर्व तिडके, मनन मानकानी, प्राची चटप, मिहीर सतदेवे, नासिर शेख, अनाबिया नवाज, विवेक चटप, राजु सतदेवे, विभांशू तिरपुडे, अनिकेत शेंडे, प्रभु फेंडर, अंजली मेश्राम, प्रतिक्षा ठाकरे, संस्कार केजरकर, अलिशा नंदनवार इत्यादींनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *