या आठवड्यातील प्रत्येक दिवस खास असतो!

प्रतिनिधी भंडारा : फेब्रुवारी महिना आला की तरुणांना व्हॅलेंटाइन डे चे वेध लागतात. दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे, सर्व जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सर्व प्रेमीजनांसाठी, त्यांचे त्यांच्या जोडीदारावर, आप्तेष्टांवर असलेले प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. १४ फेब्रुवारीच्या एक आठवडा आधीपासूनच या सोहोळ्याची सुरुवात होत असते. या सोहोळ्याची सुरुवात रोज डे पासून होते आणि व्हॅलेंटाईन डे, म्हणजेच १४ फेब्रुवारी रोजी हा प्रेमसोहळा समाप्त होतो. या आठवड्यामध्ये दर दिवशी लोक आपल्या आवडत्या लोकांना फुले, कार्ड्स आणि अनेक भेटी देतात. या आठवड्यातील प्रत्येक दिवस खास असतो. जगभरामध्ये साजºया होणाºया या संपूर्ण आठवड्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊ या. यासाठी आधीपासून तयारी केली जाते. आपल्या प्रिय व्यक्तीला चांगली भेटवस्तू देण्यासाठी गिμट शॉप, आॅनलाइन शॉपिंग साइटवर शोध सुरु असतो.पण अद्यापही काही जणांना व्हॅलेंटाइने डेच्या आधी येणाºया खास दिवसांची माहिती नाही. त्यामुळे १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे इतके लक्षात असते. तुम्हालाही हा व्हॅलेंटाइन वीक तुमच्या जोडीदारासाठी खास बनवायचा असेल, तर खास दिवसाचे वैशिष्ट्य जाणून घ्या. रोज डे मंगळवार दि.७ फेब्रुवारी २०२३: रोज डेच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला लाल गुलाबाचे फूल देऊन प्रेम व्यक्त केले जाते. खास करून तरूण आपल्या प्रेयसीला फूल देतात. मात्र या दिवशी दोघांनी एकमेकांना गुलाबाचं फूल दिले तर दिवस स्मरणात राहतो. हा दिवस खास बनवण्यासाठी, जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटलात तर तुम्ही त्याला फूल देऊ शकता किंवा पुष्पगुच्छ देऊ शकता. परंतु काही कारणास्तव बाहेर असल्यास आॅनलाइन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मद्वारे प्रिय व्यक्तीला गुलाब पोहोचवू शकता. प्रपोज डे बुधवार दि.८ फेब्रुवारी २०२३: प्रपोज डे म्हणजे व्हॅलेंटाईन वीकचा दुसरा दिवस. या दिवशी प्रत्येकजण आपल्या आवडीच्या मुलीला किंवा मुलाला प्रपोज करतो. प्रपोज करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस असल्याचे म्हटले जाते. या दिवशी जर तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला प्रपोज करायचे असेल तर तुम्ही त्याला एखाद्या रोमँटिक ठिकाणी प्रपोज करू शकता. तुम्हाला भेटता येत नसेल तर तुम्ही व्हिडीओ कॉलवरही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. चॉकलेट डे गुरुवार दि.९ फेब्रुवारी २०२३: व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो.या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन तुम्ही हा दिवस खास बनवू शकता.जर तुम्हाला हा दिवस आणखी खास बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या हाताने बनवलेले चॉकलेट देऊ शकता. यामुळे प्रिय व्यक्तीला जास्त आनंद मिळेल.टेडी डे शुक्रवार दि.१० फेब्रुवारी २०२३: या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला टेडी भेट म्हणून द्यायचा असतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराला टेडी गिμट करत असाल तर लक्षात ठेवा की, गुलाबी किंवा लाल रंगाचा टेडी गिμट केल्यास त्यांना आणखी आवडेल. याचे कारण म्हणजे मुलींना लाल आणि गुलाबी रंग खूप आवडतात. प्रॉमिस डे शनिवार दि.११ फेब्रुवारी २०२३: व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांना काही वचने देतात आणि ती पूर्ण करतात. वचन देताना आत्मविश्वासाने द्या. हग डे रविवार दि.१२ फेब्रुवारी २०२३: मिठी मारण्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. काही लोक एकमेकांना सोडून जाताना मिठी मारतात तर काही लोक मैत्रीत मिठी मारतात. पण व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रेमळ मिठी देऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. किस डे सोमवार दि.१३ फेब्रुवारी २०२३: व्हॅलेंटाइन विकचा सहावा दिवस म्हणजे किस डे. व्हॅलेंटाइन डेच्या आदल्या दिवशी हा डे साजरा केला जातो. अनेक जण या दिवसाकडे प्रेमभावनेने पाहतात. व्हॅलेंटाइन डे मंगळवार दि.१४ फेब्रुवारी २०२३: तरुण मंडळी १४ फेब्रुवारीची आतुरतेने वाट पाहात असतात.या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक लंचसाठी जाऊ शकता किंवा लांबच्या राइडवर जाऊ शकता.यावेळी तुमचे तिच्या किंवा त्याच्या प्रेम व्यक्त करू शकता.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *