जोरदार पावसाने नालीचे घाण पाणी शिरले घरात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्या तुडुंब भरल्याने राजगुरू वार्डातील सिद्धार्थ बुद्ध विहारासमोरील अनेक नागरिकांच्या घरात नाल्यांचा घाण पाणी घुसल्याने एकच तारांबळ उडाली व. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. सध्या नगर परिषदेचे पाणीपुरवठा नळ योजनेचे पाईपलाईन घालण्याचे काम सुरु असल्याने येथील नाल्यांचा पाणी रस्त्यावर येवून लोकांच्या घरात शिरले. दिनांक २२ सप्टेंबर ला येथील भीम चौकातील नाली वरील फुलाच्या खाली घातलेल्या पाईप मधून पाणी न जाता पाणी नाली वरून वाहू लागले व रस्त्या वरून लोकांच्या घरात घुसू लागले. तत्पूर्वी मोठे पाईपलाईन सुद्धा घातले गेलेत्यामुळे ही नालीचे पाणी अडल्या गेले. त्याची तक्रार दि. २८/९/२०२२ ला नागरिकांच्या सह्यांनी नगरपरिषदेला देण्यात आली होती. कारण की त्याआधी सुद्धा नाल्यांचे पाणी अशाच प्रकारे रस्त्यावर आले व लोकांच्या घरात घुसले होते. परंतु नागरिकांच्या तक्रारीवर संबंधित विभागाच्या पदाधिकाºयांनी दुर्लक्ष केले. परिणामी दि. १० व ११ आॅक्टोबरला आलेल्या पावसाचे पाणी रस्त्यावर येवून सदर नालीचे घाण पाणी नागरिकांच्या घरात घुसल्यानेआरोग्यालाच नव्हे तर त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी सातत्याने प्रलंबित पाणी पुरवठा नळ योजनेचे युद्ध स्तरावर काम करण्यात यावे, नाल्यांची सफाई व रस्त्यांची दुरुस्ती तसेच आवास योजनेचे व घराच्या पट्टयाचे काम त्वरित करावे म्हणून भाकपचे कॉ. हिवराज उके यांच्या नेतृत्वात वारंवार आंदोलन करण्यात आले. तरीसुद्धा नगर प्रशासन व जिल्हा प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे वारंवार समस्या निर्माण होत आहेत. सदर समस्येचे कायमस्वरूपी समाधान तात्काळ न झाल्यास जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा कॉ. हिवराज उके, विक्की फुले व राजगुरू वार्डातील नागरिकांनी एका पत्राकाद्वारे दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *