पूरग्रस्त मच्छिमारांच्या मागणीबाबत शासन गंभीर, आर्थिक मदतीच्या रकमेत होणार वाढ-डॉ. परिणय फुके

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आॅगस्ट २०२२ मध्ये अतिवृष्टी आणि वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावातील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले होते. या पुरामुळे बाधित झालेल्या मच्छीमार संघटनांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडे भरपाईची मागणी केली होती, मात्र भंडारा जिल्ह्यातील बाधित भागात नैसर्गिक आपत्तीसाठी शासनाने दिलेली रक्कम अल्प असल्याने ही रक्कम वाढवावी लागली, अशी मागणी मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील पूरग्रस्त मच्छिमारांच्या मागणीची दखल घेत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी नुकतीच महाराष्ट्र शासनातील मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन पूरग्रस्तांची दैना मांडली. त्यांच्यासमोर मच्छिमारांची आर्थिक भरपाईच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली. पूरग्रस्त मच्छिमारांच्या मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना आश्वासन देऊन आर्थिक मदतीच्या रकमेत वाढ करण्याबाबत वरिष्ठांना योग्य ते निर्देश दिले. फुके म्हणाले, पूरग्रस्त मच्छिमारांच्या मागणीबाबत शासन गंभीर असून, याबाबत लवकरच सकारात्मक पुढाकार घेतला जाईल.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.