शासकीय आधारभूत धान खरेदी संस्थांना जाचक अटींचा फटका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : यंदाचा खरीप हंगामातील हलक्या जातीच्या धानाची कापणी सुरू झाली आहे. अशातच केंद्र शासनाच्या निर्देशानुसार खरीप हंगामातून धान खरेदी करण्यासाठी आधारभूत हमीभाव केंद्र १ आॅक्टोबरपासून सुरू करावे, असे राज्य शासनाला निर्देश आहेत. मात्र आता पंधरवाडा लोटत असला तरी अद्यापही जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने एकही आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे जोपर्यंत उपअभिकर्ता संस्था चालकांच्या मागण्या शासन पुर्ण करणार नाही, तोपर्यंत धान खरेदी केंद्र सुरू करणार नाही, याबाबतचा निवेदन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सतीश सुपे यांना मंत्रालय मुंबई येथे धान खरेदी संघाचे सचिव अमित एच. मेश्राम यांच्याकडून देण्यात आले. जिल्ह्यात खरीप व रब्बी अशा दोन हंगामात धान पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यात येते. शेतकन्यांच्या पिकाला शासनाचा हमीभाव मिळावा, यासाठी जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन मार्फत आधारभूत हमीभाव धान केंद्राच्या माध्यमातून शेतकºयांच्या धानाची खरेदी करण्यात येते. यंदाच्या हंगामातील हलक्या जातीच्या धान पिकाची कापणी काही ठिकाणी सुरू झाली आहे.

केंद्र शासनाच्या निदेर्शाप्रमाणे राज्य शासनाने उप अभिकर्ता संस्थांना १ आॅक्टोबरपासूनच धान खरेदी केंद्र सुरू करावे, असे आदेश देणे गरजेचे आहे. मात्र भंडारा जिल्ह्याच्या विचार केल्यास अद्यापही जिल्हा मार्केटिंग फेडरेशन या उपअभिकर्ता संस्थाच्या वतीने संचालित केंद्रांनी अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू केले नाही. मागील काही वषार्पासून जिल्ह्यात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात धान खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी दिरंगाई आताही नित्याचीच झाली आहे. या प्रकाराने अनेक शेतकºयांना दलालांच्या सावटातही जावे लागले.परिणामी शेतकºयांना कमी किंमतीतही धान विक्री करण्याची वेळ आली आहे. तेव्हा लोकप्रतिनिधीसह शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देवून उपअभिकर्ता संस्थेच्या वतिने संचालित धान खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक झाले आहे. येत्या काही दिवसात दिवाळी असल्याने किमान यंदाच्या हंगामातही शेतकन्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, अशी अपेक्षा आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.