नाना पटोलेंच्या कार ला अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना भंडारा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. भंडारा जिल्ह्यात प्रचार दौºयावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या ताफ्यामधील एका वाहनाला ट्रकने धडक दिली. सुदैवाने या कारमध्ये नाना पटोले नसल्याने ते बचावले. आता या आपघातानंतर काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भंडारा तालुक्यातील गणेशपूर येथील प्रचार सभा आटोल्यानंतर नाना पटोले हे आपल्या वाहनाने (एमएच ३१, एक्स झेड ७९७) खाजगी ताफ्यासह साकोली तालुक्यातील सुकळी या स्वगावी जाण्यास निघाले होते. दरम्यान भंडारापासून ७ किलोमीटर अंतरावरील भीलेवाडा या गावाजवळ मागेहून येणाºया ट्रकची (सीजी ०४, एन टी ८७३९) त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. यात चालकाच्या मागच्या बाजुकडील भाग नुकसानग्रस्त झाला. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर तातडीने कारधा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ यांनी सहकाºयांसह घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालक गोवर्धन कुचराम (चितापूर, ता. भंडारा) याला अटक केली.

या अपघातानंतर काही काळ मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिसांंनी ती पूर्ववत केली. या घटनेनंतर ताफ्यातील अन्य वाहनातून पटोले रात्रीच साकोलीकडे रवाना झाले. नाना पटोलेंच्या ताफ्यातील कारला झालेल्या अपघातानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल विचारला आहे. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अतुल लोंढे म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौºयावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे, असा आरोप लोंढे यांनी केला. दरम्यान, या अपघातात मायबाप जनतेच्या आशीर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत,अशी माहितीही अतुल लोंढे यांनी दिली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.