दागिने व रोख रक्कम चोरणाºया महिला चोरट्यांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा बस स्थानकावरून प्रवासी महिलेचे दागिने व रोख रक्कम एकूण ४ लक्ष २० हजार ५०० रुपयाचा ऐवज अज्ञात दोन महिलांनी उडवल्याची तक्रार तिरोडा पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्यावरुन या घटनेचा तपास तिरोडा डी.बी. पथकाकडे देण्यात आला असता डी.बी. पथकाने सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल रेकॉर्ड वरून आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरी गेलेला मुद्देमाल यशस्वीरित्या जप्त केला २८ मार्च रोजी केसवाडा भंडारा येथे राहणाºया फिर्यादी महिला या भंडारा येथून बसने तिरोडा येथे येऊन धापेवाडा येथे जाण्यास दुसºया बसमध्ये बसण्यास गेले असता अज्ञात दोन महिलांनी त्यांच्या हँडबॅगमधून ७५.6ॅ सोन्याचे दागिने व रोख रक्कम पंचवीस हजार उडवून नेले याची तक्रार तिरोडा पोलीस स्टेशन येथे होताच

या घटनेचा तपास डीबी पथक प्रमुख चिरंजीव दलालवाड यांच्याकडे सोपवण्यात आल्याने त्यांनी डीबी पथकाचे महिला उप निरीक्षक दिव्या बरड,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर अंबुले,हवालदार दीपक खांडेकर, शिपाई सूर्यकांत खराबे, निलेश ठाकरे ,महिला पोलीस शिपाई नंदा बडवाईक,सोनाली डहाळे यांचे सह या चोरीचा तपास करताना तिरोडा बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज व गुमाधावडा येथील सीसीटीव्ही फुटेज व तुमसर बस स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत या दोन महिलांचा शोध घेतला तसेच त्यांचे मोबाईल नंबर मिळवून मोबाईलचे लोकेशन वरूनही तपास केला असता या महिला पारशिवनी येथील सोनू रितेश भिसे ३० वर्ष व सीमा विजय नाडे ५३ वर्ष राहणार रामेश्वरी टोला रिंग रोड अजनी नागपूर या असल्याचे लक्षात आल्यावरुन पारशिवनी येथे जाऊन शोध घेतला असता आरोपी सोनु भीसे हिचे घरुन चोरी गेलेले अ‍ॅप.6ग्रॅम सोन्याचे दागिने व 15 रोख रक्कम जप्त करून तिरोडा पोलीस स्टेशन येथे आणून कायदेशीर कारवाई केली तिरोडा डी.बी.पथकाचे या यशस्वी कार्यवाही मुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.