संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज भव्य प्रवचन कार्यक्रम

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा/गोंदिया : इंडिया नव्हे तर भारत म्हणा हा संदेश देणारे संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचा २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य भाषण व देशभक्ती गीतांचा कार्यक्रम वसंत राईस मिल डोंगरगाव, ता.सडक/अर्जुनीच्या प्रांगणात संपन्न होईल. आचार्य श्री जीं च्या कार्यक्रमात उत्तम देशभक्ती गीत, लेझिम, व श्री गुरुदेवजी यांचा प्रवचनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाची रूपरेखा माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सांगितल्या प्रमाणे निखील जैन, राजू एन जैन, प्राचार्य आलोक दिवेदी, प्राचार्य झिंगरे देवरी, केतन तुरकर, वसंत हाईस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दिवटे पाहत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गंगाधर परशुरामकर, डॉ. सुगत चंद्रिकापुरे, डॉ अविनाश काशिवार, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणवीर, अजय लांजेवार, रीता लांजेवार, यशवंत परशुरामकर सहकार्य करित आहेत. गोंदिया शिक्षण संस्था व दिगंबर जैन ट्रस्ट चंद्रगिरि डोंगरगढ़ कार्यक्रमाचे सूत्रधार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *