कतव्यावर कसर कल्यापकरणी हलगजी डाक्टरला तात्काळ निलबित करा !

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आज दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी भंडारा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा व जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय भंडारा यांना निवेदन देण्यात आले. दिनांक २४ जानेवारी २०२३ ला गराडा, ता. लाखनी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाºया आरोपीवर कठोर कारवाई करुन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी. तसेच पिडीत मुलीची तब्बल ३ तास सामान्य रुग्णालयातीलकर्तव्यावरील डॉक्टरांनी मुलीवर प्राथमिक उपचार केले नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे पिडीत मुलींचे जीव धोक्यात आले आहे. त्यामुळे कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी अशा हलगर्जी डॉक्टरला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे जिल्हयात तीव्र जनआंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा व जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांना देण्यात आले. यावेळी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, महासचिव धनंजय दलाल, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा सौ. सरिताताई मदनकर, शहर अध्यक्षा सौ. मंजुषा बुरडे, तालुका अध्यक्षा सौ. सोनल पवनकर, युवक शहर अध्यक्ष अश्विन बांगडकर, गणेश बाणेवार, संजय वरगंटीवार, राहुलनिर्वाण, महेंद्र बारापात्रे, बंडु चेटूलें, सौ. राजेश्री राखडे, सौ. संगिता चव्हाण, श्रीमती किर्ती कुंभरे, नगरसेविका जुमाला बोरकर, निशा राऊत, पं.स.सभापती सौ. रत्नमाला चेटुले, लाखनी तालुका अध्यक्ष सौ. अर्चना ढेंगे, सौ. सुनिता निर्वाण, इंदुताई येरकडे, लता मेश्राम, वृंदा गायधने, मीना तिरपुडे, पं.स.सदस्य सौ. किर्ती गणविर, विद्या साखरे, सौ.वनिता भुरे, नगरसेविका सौ. शुभांगी खोब्रागडे तसेच मोठया संख्येने शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.