भंडारा जिल्हा परिषदेत ३२० पदांची मेगा भरती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्हा परिषद भंडारा येथील विविध विभागांमधील गट-क संवगार्तील एकूण ३२० रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येत आहे. या मध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ट सहायक (लिपीक), कनिष्ठ सहायक (लेखा), पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ट सहायक (लिपीक), वरिष्ट सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (सांख्यीकी), स्थापत्य अभियांत्रीकी सहायक, अंगणवाडी पर्यवेक्षीका ही पदे असून या रिक्त पदांकरिता आॅनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ५ ते २५ आॅगस्ट २०२३ पर्यंतअसणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५ आॅगस्ट २०२३ रोजीच्या रात्री २३.५९ वाजेपर्यंत आॅनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. रिक्त पदांचा तपशिल पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमयार्दा, परीक्षा शुल्क, आॅनलाईन अर्ज करण्याची पध्दत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद भंडाराच्या www.bhandarazp.org या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध आहे.सदर पदभरती संदर्भात अडचणी किंवा समस्या उदभवल्यास हेल्प लाईन क्रमांक ०७१८४-२५५२२६२ व हेल्प लाईनE-mail ID :- zpbhanfdararecruitment2023@gmail.coयावर संपर्क साधावा.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *