इंदिरा गांधी तथा सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारताच्या माझी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गिय इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथि तथा लोहपुरुष स्वर्गीय सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतिनीमित्त अभिवादन सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन भंडारा शहर कांग्रेस कमेटी तर्फे भंडारा येथे करण्यात आले होते. या सभेत स्वर्गिय इंदिराजी गांधी तथा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जिवन चरित्रावर कांग्रेस कमेटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रकाश टाकत चर्चा करण्यात आली. व या दोन्ही महापुरुषांना या वेळी आदरांजलि अर्पण करण्यात आली. यावेळी कांग्रेसचे माजी भंडारा जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणविर, भंडारा शहर अध्यक्ष प्रशांत देशकर, जिल्हा महिला अध्यक्षा जयश्री बोरकर इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.