तीन सायबरियन पक्षी आढळले जखमी अवस्थेत,शिकारीची शक्यता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : हिवाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील जलाशयांवर विदेशी पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात झाली आहे. मात्र या जलाशयांवर विदेशी पक्षी सुरक्षित नाहीत. शनिवार, २९ आॅक्टोबर रोजी वनविभागाच्या पथकाने ३ सायबेरियन पक्षी जखमी अवस्थेत पकडले. उपचारानंतर त्यांना सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. विदेशी पक्ष्यांची शिकार करण्यासाठी शिकारी सक्रिय झाल्याचे या प्रकार- ावरून दिसून येत असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया ओळखला जातो. जिल्ह्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. याच काळात जिल्ह्यातील जलाशये, तलाव, पाणवठ्यांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन होत असते. या पक्षांना पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याच्या सीमावर्ती राज्यातून पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होतात. यंदाही आॅक्टोबरच्या दुसºया पंधरव- ाड्यात देशी व विदेशी पक्षांचे जिल्ह्यात जलाशयांवर आगमन सुरु झाले आहे.

मात्र, मोठ्या संख्येने पक्षी येत असल्याने काही शिकारी या पक्ष्यांची शिकार करण्याचाही प्रयत्न करतात. तशा घटनाही समोर आल्या आहेत. गोरेगाव वन परिक्षेत्राच्या पथकाने गोरेगाव वन परिक्षेत्रांतर्गत तुमखेडाढिवरटोली वनक्षेत्रात सायबेरियन प्रजातीचे तीन पक्षी जखमी अवस्थेत पकडले. उपचारानंतर त्यांना सुरक्षित स्थळी सुखरूप सोडण्यात आले. यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाºयांनी सांगितले की, पक्ष्यांना इजा करण्याच्या उद्देशाने अज्ञातांनी सापळा रचला असावा किंवा काही साहित्याने त्यांना जखमी केले असावे. या प्रकारावरून पक्ष्यांच्या शिकारीसाठी शिकारी सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत वनविभागाने या दिशेने तपास करून या शिकारींवरही करडी नजर ठेवण्याची मागणी होत आहे. विदेशी पक्षी जखमी अवस्थेत असल्याची माहिती विभागाला मिळाली. माहिती मिळताच घटनास्थळी पथक पोहोचले असता तीन तरुणांच्या हातात सायबेरियन प्रजातीचे पक्षी होते. चौकशीत त्यांना पक्षी जखमी अवस्थेत दिसल्याचे निष्पन्न झाले. तिन्ही पक्ष्यांवर उपचारानंतर सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आल्याचे गोरेगाव वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी मनोज गाढवे यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *