जनावरांची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : जनावरांना कत्तली करिता घेऊन जाण्यासाठी अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या दोन वाहनांना पोलिसांनी पकडले. गोरेगाव पोलिसांनी ठाणा चौक येथे बुधवारी (दि.१५) सायंकाळी ४ वाजेदरम्यान ही कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी दोन वाहने व ११ जनावरे असा एकूण चार लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यात होणाºया आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत अवैधरीत्या धंदे करणाºयांवर कारवाई करण्याचे, तसेच सर्व अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करून आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी सर्व ठाणेदारांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पोलिसांची अवैध धंदे करणाºयांविरुद्ध धाड मोहीम सुरू आहे.

अशात बुधवारी (दि.१५) गोरेगाव पोलिसांनी डायल ११२ वरून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ठाणा चौक येथे सायंकाळी ४ वाजेदरम्यान अवैधरीत्या जनावरांची वाहतूक करणाºया बोलेरो पिकअप वाहन क्रमांक एमएच ३५ के ४०९९ व वाहन क्रमांक एमएच ४० एएफ ६०५८ ला पकडले. या वाहनांची तपासणी केली असता त्यात एकूण ११ जनावरे निर्दयीपणे कोंबून व बांधून ठेवल्याचे दिसून आले. यावर पोलिसांनी दोन्ही वाहने किंमत चार लाख रुपये व ५५ हजार रुपये किमतीची जनावरे,असा एकूण चार लाख ५५ हजार रुपयांचा माल जप्त केला. ही कामगिरी पो.नि. भुसारी यांचे पथक सपोनि. अमोल काळे, पोउपनि सुजित घोलप, सहायक फौजदार यशवंत शहारे, हवालदार अडमाची, लांजेवार, शिपाई कुमडे, केवट, दास, खेकरे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *