खा. पफल पटलाच्या आगही भमिकन चटिया यथील शतकºयाना मिळाला न्याय

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया: तालुक्यातील चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या धान खरेदी घोटाळा प्रकरणाला घेवुन पणन विभागाकडून ४३२ शेतकºयांचे चुकारे अडविण्यात आले. यासाठी शेतकºयांनी मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाचे उंबरठे झिजविले. तरी चुकारे संदर्भात कसलीही कार्यवाही होत नसल्याने २४ आॅगष्ट रोजी शेतकºयांच्या शिष्ट मंडळाने खासदार प्रफुल पटेल यांच्याशी भेट घेवून व्यवस्था मंडली. दरम्यान दिलेल्या आश्वासना अनुरुप शेतकºयांना न्याय मिळावा या दृष्टिकोणातुन राज्य सरकार, पणन महामंडल, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाशी संपर्क साधुन आग्रही भुमिका घेतली. यामुळे अन्न व नागरी पुरवठा कडून त्या ४३२ शेतकºयांच्या खात्यात चुकारे जमा करण्याची कार्यवाही शुरू करण्यात आली आहे. खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या आग्रही भुमिकेमुळे क्षेत्रातील शेतकºयांना न्याय मिळाला आहे. तसेच उर्वरीत शेतकºयाांचे प्रश्न ही मार्गी लावण्यात येणार आहे. चुटिया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या धानघोटाळा उघडकीस आलायामुळे मार्केटिंग फेडरेशन कडून सस्थेला धान विक्री करणाºया शेतकºयांचे चुकारे अँडविले.

यासाठी शेतकºयांनी आटापिटा सुरु केले मात्र मार्केटिंग फेडरेशन कडून कसला ही प्रतिसाद मिळाला नाही. एवढेच नव्हे तर शेतकºयांनी आंदोलनाची भर्मिका स्वीकारली. त्याच प्रमाणे २४ आॅगष्ट रोजी खासदार श्री प्र पटेल जिल्हयाचे दौराºयावर असतांना शेतकºयाांच्या शिष्टमंडळांनी त्यांची भेट घेवुन त्यांची व्यवस्था मांडली. शेतकºयांचे प्रश्न मार्ग लावण्यासाठी खासदार श्री पटेल यांनी क्षणभराचा वेळ वाया न घलविता संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी दुरध्वनीवर चर्चाकेली. तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री ना. अजित दादा पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, अन्न व नागरी विभागाचे मुख्य सचिव,मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संपर्क करुन शेतकºयाांचे चुकाºयाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे सुचना केल्या. खासदार श्री पटेल यांच्या आग्रही भुमिके मुळे शासन प्रशासन कामाला लागला. सतत च्या पाठपुराव्याने शेतकºयाच्या खात्यात चुकारे जमा करण्याची प्रक्रिया विभागाकडून सुरु झालेली आहे. यामुळे चुटियाच्या त्या ४३२ शेतकºयांना न्याय मिळाला आहे. तर उर्वरीत शेतकºयांचे प्रश्न ही मार्गी लावण्यासाठी खासदार श्री पटेल प्रयत्नरत आहेत. उल्लेखनीय असे कि या प्रकरणाला माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांनी देखील खासदार श्री प्रफुल पटेल यांचे सतत लक्ष वेधले. त्यामुळे चुटियाच्या शेतकरी तुकाराम बघेले, सुरेश पटले, प्रभु पटले, त्रिलोक ढोमणे, दीपक कंसारे, अनिल पगरवार, व अन्य शेतकºयांनी खासदार श्री पटेल व माजी आमदार राजेन्द्र जैन यांचे आभार मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.