ट्रेलरची एसटी बस व टिप्परला जोरदार धडक सुदैवाने जीवितहानी टळली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : बिरसी मार्गावर १७ तारखेचे रात्री ९ वाजता चे दरम्यान एका भरधाव ट्रेलरने रिकामे एसटी बस व टिप्परला जोरदार धडक दिली. सुदैवाने ही बस रिकामी असल्याने तसेच टिप्पर न उलटल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही. शनिवार दि. १७ जून रोजी विभागीय कार्यशाळा भंडारा येथून चालक मनोज डहाटे, गोंदिया आगाराची रिकामी बस क्रमांक एम. एच.२० बी. एल. ४२०६ घेऊन तिरोडा मार्गे गोंदियाकडे जात असता तिरोडा बीरसी मार्गावरील साई राईस मिल समोर त्यांना समोरून एक भरधाव ट्रेलर त्यांच्याकडे येत असल्याचे दिसल्यामुळे त्यांनी बस रस्त्याचे कडेला उभी केली असता समोरून येणारे एम. एच. ४० एके ४६०४ चार कंटेनर घेऊन जाणारे ट्रेलर ने त्यांचे बसला जोरदार धडक देत ड्रायव्हरचे केबिन पासून मागे पर्यंत बस चीरडत नेली, तसेच समोर जातअसलेले टिप्पर क्रमांक एम. एच.३५ एजे २७०९ यासही जोरदार धडक दिली. मात्र सुदैवाने टिप्पर न उलटल्याने टिपर चालक सुदैवाने बचावले.

भरधाव टेÑलर रस्त्याचे कडेला थांबला असुन अपघात होताच ट्रेलर चालक घटनास्थळावरून पळून गेला. बस चालक मनोज डहाटे राहणार साईनगर मरारटोली गोंदिया याचे तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी ट्रेलर चालकाचे विरोधात भादवि कलम २७९ मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार नितेश बावणे करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *