सावरी येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा तहसिल अंतर्गत इंदिरा नगर (सावरी) येथील करुणा बौद्ध विहार येथे दिनांक १५ जुन २०२३ गुरुवार ला सकाळी ९:३० ते दुपारी २ वाजे पर्यंत भारतीय राजकारण भांडाफोड समिती तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एकुण ८५ रुग्णांनी आरोग्य तपासणी केली,. या शिबिरात डॉ. हंसदास शहारे, डॉ. कोणते या विषयावर सविस्तर मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच गट. ग्रा. सावरीचे गिरीश ठवकर यांच्या हस्ते करण्यात आले तर अध्यक्ष म्हणून एम. राजाभोज हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हंसदास शहारे, तर गट ग्रामपंचायत सावरीचे सदस्य मोटघरे तसेच सुमनताई जनबंधू, यशोदा वंजारी आदी अतिथी गण उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन. धम्मराज यांनी केले. तर प्रास्ताविक संजय रंगारी यांनी केले तर आभार प्रदर्शन नेत्राताई यांनी पार पाडले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रम शांततेत पार पडले तसेच या कार्यक्रमाचे आयोजकांसोबत करुणा बौध्द विहार कमिटीच्या विश्वस्तांनी व संपूर्ण इंदिरानगर येथील रहिवासी नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. जंगम, डॉ. मेश्राम, गोवर्धन ईटनकर, नागो मळकाम, संजय रंगारी, वच्छला मेश्राम, संध्या मेश्राम, शालिनी मोटघरे, माया रामटेके, किरण मेश्राम, कमला शेलारे, नुतन चौरे या महिला भगिनीं या शिबिरा प्रसंगी उपस्थित होते. शिबिर संपल्यानंतर सायंकाळी ७ वाजता जाहीर प्रबोधन सभेचे आयोजन करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *