जमिनीच्या सुपिकतेसाठी जैविक खतांचा वापर करावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाबीज बियाणे विविध चाचण्यांमधून पात्र झाल्यानंतरच विपणनासाठी उपलब्ध होते. जमिनीत जिवंतपणा असायला पाहिजे. जमिनीची सुपिकता, जैविकता कायम राहावी म्हणून जैवित खते, जैविक बुरशीनाशके तसेच महाजैविक खताचा वापर करावा, असे आवाहन महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी केले. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विक्रेत्यांची सभा होटल ग्रीन पार्क, नवेगाव बांध येथे नुकतीच (दि. २५ मे,) पार पाडली. त्यावेळी ते बोलत होते. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोला विपणनचे महाव्यवस्थापक प्रकाश ताटर, नागपूर विभागीय व्यवस्थापक प्रविण देशमुख यांच्यासह भंडारा जिल्ह्यातील १७ व गोंदिया जिल्ह्यातील १८ विक्रेत्यांची उपस्थिती होती.

महाबीजकडे उपलब्ध असलेल्या धान पिकाचे वाण, हिरवळीचे खतेतसेच विक्रेत्यास महाबीज मार्फत राबविण्यात असलेल्या योजना तसेच अनुदानाबाबत माहिती विभागीय व्यवस्थापक प्रविण देशमुख यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विक्रेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील खरीप २०२२ मध्ये विक्रीसाठी प्रथक क्रमांक नितीन मार्केटिंग भंडारा, व्दितीय क्रमांक कापगते कृषी केंद्र, साकोली तर सहकार क्षेत्रात प्रथम क्रमांक तालुका खरेदी विक्री संघ, लाखनी व व्दितीय क्रमांक तालुका खरेदी विक्री संघ, पवनी यांनी पटकावला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक ए. एन. गावंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कृषी क्षेत्र अधिकारी पल्लवी बन्सोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी. ई. पाटील, श्रीमती सव्वालाखे, भावेश वनकर, सचिन पुंड यांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *