आमदार भोंडेकर यांनी घेतला जिल्हा रुग्णालयाचा आढावा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आ. नरेंद्र भोंडेकर यांनी जिल्ह्याच्या आरोग्य विषयाला गांभियार्ने घेतले असून त्यांनी गुरुवार ला येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि रुग्णालयात होत असलेल्या गैरसोईचा आढवा घेतला. या वेळी आम. भोंडेकर यांनी जिल्हा शैल्य चिकित्सक, रुग्णालय कर्मचारी आणि रुग्णांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, ज्यात कर्मचाºयांचा तुटवड्याचा प्रश्न गंभीरतेने घेत याचा शासन कडे पाठपुरावा करून सर्व पदे भरण्यात येण्याचे आश्वासन दिले. भंडारा जिल्हा ग्रामीण रुग्णालयाची इमारत हि देखभाल अभावी जीर्ण होत आली आहे. ज्या मुळे येथील रुग्णांना नवीन इमारतीत हलविण्यात आले आहे ज्यात अपघात ग्रस्त, अतिदक्षता विभाग, दयलीसिसी व मेडिसिन रुग्णांना येथे हलविण्यात आले आहे. आम. नरेंद्र भोंडेकर यांनी हलविण्यात आलेल्या रुग्णांची भेट घेतली.आ. नरेंद्र भोंडेकर यांनी नवीन इमारतीच्या प्रत्तेक विभागत व वार्डात स्वत: जाऊन तिथे होत असलेल्या गैरसोई जाणून घेतल्या. या वेळी उपस्थित जिल्हा शैल्य चिकित्सक सय्याम यांनी जिल्हा रुग्णालयात श्रेणी ‘अ’ ते ‘ड’ पर्यंत एकूण ९० पडे रिक्त असल्याची माहिती दिली. ज्यावर आम. भोंडेकर यांनी रिक्त पदा संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर पदे भरण्याचे आश्वासन दिले. सोबतच आ. नरेंद्र भोंडेकर यांनी जुन्या इमारतीच्या देखभाल दुरुस्ती करिता शासनाला प्रस्ताव पाठवून या करिता निधी उपलब्ध करून देण्या करिता पाठपुरावा करण्याचेही आश्वासित केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *