…तर खाते बंद करून टाका

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बँकेतील कर्मचाºयांमार्फत ग्राहकांशी उद्धटपणाची वागणूक ही जणू नेहमीची झालेली पाहायला मिळते. बँकेतील ग्राहक जणू बँकांकडे पैसे उधार मागायला जातात की काय? अशाप्रमाणे बँकेतील कर्मचाºयांची ग्राहकांशी वागणूक दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार भंडारा येथील बँक आॅफ महाराष्ट्र च्या मुख्य शाखेत पाहायला मिळाला. घटना अशी की, बँक आॅफ महाराष्ट्र मुख्य शाखा भंडारा येथील ग्राहक रुपेश सपाटे हे मागील काही दिवसांपासून पासबुक प्रिंटिंग करिता बँकेत फेरे मारत होते. परंतु बँकेत वारंवार “आता पासबुक एन्ट्री बंद आहे आठवडाभराने या” असे उत्तर त्यांना दिले जात होते. अशातच ९ आॅगस्ट रोजी पुन्हा सपाटे हे भंडारा येथील बँक आॅफ महाराष्ट्राच्या मुख्य शाखेत गेले. तेथील एका काउंटरवर असलेल्या सोनल भरतकर या महिला कर्मचारी यांच्याशी पासबुक एन्ट्री करण्याकरिता विचारले असता “एन्ट्री बंद आहे दोन आठवड्यांनी या” असे उत्तर त्यांना मिळाले.

वारंवार मिळणाºया या उत्तराला कंटाळून नेहमीच तुम्ही असे उत्तर देता पण, तुमच्याकडून एन्ट्री करून दिली जात नाही असे ग्राहक रुपेश सपाटे यांनी म्हटले असता सोनल भरतकर या महिला कर्मचाºयामार्फत “बँक तुम्हाला सुविधा देत नसेल तर खाते बंद करून टाका” असे उर्मट प्रत्युत्तर त्यांना मिळाले. ग्राहकांच्या जमापुंजीवर व्याज आणि कर लावून मिळणाºया पैशावर पगार उचलणाºया बँकेतील कर्मचाºयांमार्फत ग्राहकांनाच जर असे उत्तर आणि उद्घटतेची वागणूक मिळत असेल तर तर बँक ग्राहकाने जावे कुणाकडे? असा प्रश्न निर्माण करत सदर महिला कर्मचाºयांवर कारवाई करावी अशी मागणी शाखाव्यवस्थापक व झोनल कार्यालयाला करण्यात आली आहे. एकीकडे सरकार तर्फे नॅशनलाईज बँकेत खाते उघडण्याकरिता प्रवृत्त केले जात आहेत तर दुसरीकडे नॅशनलाईज बँकेतले कर्मचारीच ग्राहकांना खाते बंद करून टाकण्याच्या सल्ला देत आहेत. सरकारी कर्मचाºयांच्या अशा वर्तनामुळे अनेक सर्वसामान्य बँक ग्राहक त्रस्त असून खाजगी बँकांकडे वळत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *