घरकुल निधी..! पडोळे यांची श्रेय लाटण्यासाठी केविलवाणी धडपड!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर: घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळाल्या नंतर वर्ष लोटूनही मात्र केंद्र शासनाकडून दुसरा हप्ता न मिळाल्याने लाभार्थ्यांना पावसाळ्यात उघड्यावरच संसार थाटण्याची वेळ आली असताना त्याचा पाठपुरावा केंद्र सरकारकडे करून निधी न. प. ला प्राप्त झाली. ही वस्तुस्थिती असताना याचे श्रेय लाटण्यासाठी आयत्या बिळात… बनून माजी नगराध्यक्ष प्रदिप पडोळे हे केविलवाणी धडपड करत असल्याची टीका माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी केली आहे. नगर परिषद तुमसर तर्फे शहरातील प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत सन २०२० ते २०२२ मध्ये मंजूर झालेल्या जवळ पास २०० घरकुल लाभार्थ्यांनी आपली जुनी राहती घरे पाडून घरकुलाचे बांधकाम हाती घेतले. मात्र पक्के घर बांधकामासाठी अनुदान मिळणार असल्याने संबंधित लाभार्थिनी जुने घर पाडून नवीन घराचे बांधकाम सुरू केले.

अनुदानाचा दुसरा हप्ता केंद्र शासनाकडून मिळाला नसल्याने लाभार्थ्यांनी जुने घर पाडल्याने आणि नवीन घर अर्धवट असल्याने अनेकांवर झोपडीवजा घरात राहण्याची वेळ आली असताना माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी न. प. प्रशासनाला धारेवर धरत केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. दरम्यान केंद्र शासनाचा दुसरा हप्ता हा न. प. तुमसरला जमा होताच प्रदिप पडोळे यांनी याचे श्रेय लाटण्यासाठी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो व त्यांनी निधी जाहीर केली व त्यांनी फडणवीस यांचे आभार मानले अशी माध्यमात बातम्या प्रकाशित करून श्रेय लाटण्यासाठी केविलवाणी धडपड करत सुटले. वास्तविक पाहता सन २०१८ मध्ये मंजूर झालेल्या घरकुलाचा निधी हे नगराध्यक्ष पदावर विराजमान असताना तसेच राज्यात व केंद्रात यांचेच सरकार असताना देखील हे भाजला पापड ही तोडू शकले नाही. परिणामी घरकुल लाभार्थ्यांना निधी अभावी सलग ५ वर्ष तातपडत राहावे लागले. ही वस्तुस्थिती आहे. असे असताना आपणच सर्व करत आहोत असे बातम्यांच्या माध्यमातून भासवून श्रेय लाटण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र ये पब्लिक है सब जानती है. अशीही टीका माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *