बौध्द महासभा व समता सैनिक दलाची कार्यकारणी गठीत

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या निर्देशानुसार गांधी वार्ड, देव्हाडी येथील भीमज्योती बुद्ध विहारामध्ये सभा घेऊन कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. विलास माटे, प्रमुख अतिथी म्हणून वसंत नंदागवळी, कुंदा गजभिये, अशोक हुमने यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दलाची कार्यकारणी गठीत करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी देव्हाडी, गांधी वार्ड शाखेचे अध्यक्षपदी उपासना बनसोड, तर सचिवपदी सुषमा गेडामची बहुमताने निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी पल्लवी गोईल, कार्याध्यक्ष शितल रोडगे, सहसचिव रीता बागडे, कोषाध्यक्ष संध्या रोडगे आणि अनुसया डोंगरे, मीना बागडे, सविता मेश्राम, कुंदाताई वासनिक, गीताताई भवसागर, नलिनी रोडगे ,उर्मिला नागदेवे, कैवल्या उके, निसर्ग वासनिक, माया कुंभलकर, पौर्णिमा बनसोड यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. तसेच सल्लागार समितीचे अध्यक्ष सुधा उके, सदस्य अमिषा भवसागर, पंचशीला रोडगे, माया कुंभलकर, लीला मंडपे यांची बहुमताने निवड करण्यात यावेळी प्रमुख वक्त्यांनी उपस्थित उपासक व आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उपासना उपाशीकांना धम्म प्रबोधन करून मार्गदर्शन केले. बन्सोड, बिंदू नंदागवळी, निर्मला हुमने, हरेंद्र भवसागर यांनी अथक प्रयास केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *