विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रबोधन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जागतिक विज्ञान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर विज्ञान प्रदर्शन जादूटोणा विरोधी कायदा २०१३ प्रचार आणि प्रसार सापाविषयी समाजात असलेल्या गैरसमजुती याविषयी बॅनर चित्रमय प्रदर्शनीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता प्रेमचंद भोपे यांच्या हस्ते लिंबू व मिरचीच्या तोरणाचे जाळून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मअंनीसचे बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्य विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, अखतर बेग मिर्झा, पुरुषोत्तम गायधने, प्राध्यापक नरेश आंबीलकर, अनुभव शिक्षा केंद्र साथी आकाश रामटेके, कविता लोणारे, गणेश बाणेवार आदी उपस्थित होते. समाजात असलेली अंधश्रद्धा दूर व्हावी व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा असे मत लोणारे यांनी मांडले तसेच छापा विषयी माहिती देण्यात आले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक युवराज खोब्रागडे, डॉक्टर विश्वजीत थुलकर, शाहीर प्रकाश नागतोडे, डॉक्टर नरहरी नागलवाडे यांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *