दसरा मेळावा,अडीच हजार कार्यकर्ते मुंबईकरिता रवाना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा :आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात भंडारा येथील तब्बल अडीच हजार शिवसैनिक शिंदे गटाच्या मुंबई येथील दसरा मेळाव्याकरिता आज रवाना झाले. आ. भोंडेकार यांनी बसगाड्यांचे पूजन करून प्रवासाकरिता हिरवी झेंडी दिली. मुंबई येथील बांद्रा कुर्ला मैदानावर शिंदे गटाचा भव्य दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकरिता शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह पहावयास मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातून आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे नेतृत्वात तब्बल अडीच हजार शिवसैनिक शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. याकरिता आज मंगळवार ४ आॅक्टोबर रोजी दुपारी २ वाजता खाजगी बसगाड्या रवाना झाल्या. हिंदु हृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा व हिंदुत्वाचा गजर करीत आमदार भोंडेकर यांनी भगवा झेंडा दाखवून प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. भंडारा शहरातून १० व इतर तालुक्यांमधून १५ असे एकूण २५ बस मधून तब्बल २५०० शिवसैनिक मुंबई करिता रवाना झाले. तसेच काही पदाधिकारी व कार्यकर्ते रेल्वे, खाजगी वाहनाने जाणार आहेत. मुंबई करिता जाणाºया सर्व कार्यकर्त्यांच्या व्यवस्थेची जबाबदारी तालुका निहाय व जिल्हाप्रमुख यांच्यावर देण्यात आली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *