नुकसानग्रस्त शेतकºयांना एकरी २५ हजार रुपये प्रति हेक्टर सरसकट द्या

भंडारा : भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजीत पवार गट) तर्फे आज दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत जिल्हयातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट तातडीने नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत करण्याबाबद निवेदन देण्यात आले. मागील दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्हयात अवकाळी पाऊस झालेला आहे. भंडारा, लाखनी, मोहाडी आणि इतर भागातही पावसाळी बाबाचे पीक निघाल्याने शेतकºयांनी मोठया प्रमाणावर तुर, उडीद, मुग, लाखोरी, चना, मका या पिकाची लागवड केलेली आहे. परंतु या दोन दिवसांपासून संपूर्ण जिल्हयात कमी जास्त अवकाळी पाऊस झाल्याने कापणीस आलेला धान, कापणी झालेल्या पानाचे पडून असलेली कडपे, धान कापणी झाल्यानंतर पेरण्यात आलेले वना, गहू, मका, तुर, लाखोरी, उडीद व इतर कडधान्य यांचे या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तसेच शेतातील पान कापणी करून शेतात तयार केलेली पुजणे यांचेही नुकसान झालेले आहे.

या सर्वांचे पंचनामे करून शेतकºयांना तातडीने सरसकट मदत करणे गरजेचे आहे. जिल्हयात मोठया प्रमाणावर असलेला धान, कडधान्य, भाजीपाला, तुर, उडीद, लाखोरी आणि मक्का या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्यांना सरसकट हेक्टर २५०००/रुपए नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती या निवेदना द्वारे करण्यात आली. त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित पक्षश्रेष्ठी जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष यशवंत सोनकुसरे, तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, आरजु मेश्राम, किर्ती गणविर, राजु सलाम पटेल, हितेश सेलोकर, नेहा शेंडे, गनेश चौधरी, विष्णू कढिखाये, अमन मेश्राम, राजेश वासनिक, नरेश येवले, प्रभाकर बोदेले, राजेश डोरले, नागेश भगत, कृष्णा बेडुरकर, शालिक कागदे व फार मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *