पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांना ३० हजार हेक्टरी मदत द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हयात अवकाळी पाऊसामुळे मोठया प्रमाणात शेतकºयांचा धान पिक तसेच भाजीपाला यांचा नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकºयांचा नुकसानीचा पंचनामा करुन करुन शेतकºयांना नुकसानीचा मोबदला देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. जिल्हयात अवकाळी पाऊसा सोबतच अनेक समस्या असुन यामध्ये प्रामुख्याने भंडारा जिल्हा ओला दुष्काळ घोषित करा. भंडारा जिल्ह्यातील शेतकºयांना ३००००रु.प्रती हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करा. धान खरेदी केंद्राच्या जाचक अटी कमी करून धान खरेदी लवकर सुरू करा. दुधाला शासनाने ठरऊन दिलेल्या रेट ने खाजगी व्यापाºयांनी किंमत द्यावी. भंडारा जिल्हा पीक विम्याच्या कक्षेत यावे. रानडूकराला मारण्याची परवानगी देण्यात यावी. माकडांना पकडण्याची शासनाने पथक मोहीम राबवावी. भाजीपाला उत्पादक शेतकºयांसाठी पावसामुळे नुकसान झाले त्यांना सरसकट मदत जाहीर करा. नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना आर्थिक मदत जाहीर करा. दोन्ही कर्ज माफीच्या कक्षेतून सुटलेल्या शेतकºयांचे संपूर्ण कर्ज माफ करा. वन्य प्राण्यांच्या शेतीला बचाव करण्यासाठी तारेचा कुंपनासाठी सिमेंट किंवा लोखंडाच्या पोल उपलब्ध करुन द्या. शेतीला दिवसा १२ तास वीज पुरवठा करा.

तुमसर येथील बहुचर्चित फेरो अलोयाईज कारखान्याची विद्युत पुरवठा माफ करून कंपनी तात्काळ शुरू करा. तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी तालुका स्तरावरील उद्योगधंदे सुरू करा. भंडारा जिल्ह्यातील आदिवासी व इतर समाजाचे भागातील रखडलेले वन जमिनीचे पट्टे त्वरित देण्यात यावे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांची परीक्षा फी अगदी कमी आकारण्यात यावी. पांदण रस्त्याची मुरुमाची लिज प्रक्रिया कमी करण्यात यावी. शिक्षकांचे ब्रेन मॅपिंग झाले पाहिजे जेणे करून गरिबांच्या मुलांना फुकट शिक्षण घेता यावे. आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून सदर मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने रस्तारोको तसेच जेलभरो आंदोलन करण्यात येईल व याची सर्व जबाबदारी ही शासनाची राहील असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने देण्यात आले.

निवेदन देतेवेळेस सलील देशमुख युवा नेते महाराष्ट्र, सौरभ मिश्रा युवक काँ. प्रभारीविदर्भ, किरण अतकरी जिल्हाध्यक्ष, शैलेद्र तिवारी, ठाकचंद मुंगुसमारे जिल्हाध्यक्ष यु.काँ, अजय मेश्राम भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष, मधुकर चौधरी भंडारा शहराध्यक्ष, नरहरी वकडे अनुसूचीत जाती सेल, नितेश मारवाडे जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल, ईश्वर कळंबे तालुकाध्यक्ष, सौ.शहीना पठाण महीला शहराध्यक्ष, दिलीप सोनुले, यशवंत चानोरे, रविकिरण लंजे, प्रफुल गायधने, राजेश शिवरकर, मधुकर भोपे, देवानंद चौधरी, भूपेंद्र चौधरी, किशोर मुलुंडे, भाउदास धूर्वे, अरुण गोंडाने, प्रदीप मडावी, आनंदराव चोपकर, कुणाल पवार, राकेश हटवार, नीलिमा रामटे- के, सुनील शेंडे, निशांत हुमने, प्रफुल मेश्राम, निशांत सुखदेवे, सुखराम अतकरी, यशवंत भोयर, भूषण लांडगे, शायना खान, योगिता सूर्यवंशी, शहजादा भाऊ, दीपक वाघाये, आहुजा डोंगरे, बबलू बोपचे, ईश्वर तांडेकर, ज्ञानेश्वर पडोळे, मंगेश मेश्राम, निखिलेश खांडेकर, विजय नवखरे, महेश नखाते, एकनाथ फेंडर, नरेश ईश्वरकर, माधुरी चौधरी, सचिन मेश्राम, दिवाकर चौधरी, सुनिता डोंगरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *