जांब येथे नवनिर्मीत ग्रा.पं.इमारतीचे लोकार्पण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा: मोहाडी तालुक्यातील जांब ग्राम पंचायतीच्या नवनिर्मीत इमारतीचा उद्घाटन सोहळा आज दि.१५ सप्टेंबर रोजी माजी आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नलीनी कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. जांब ग्राम पंचायतीच्या नविन ग्रा.पं. इमारतीकरीता स्व.श्री. आत्मारामजी कोरडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जांब येथील जगदीश कोरडे व नलीनीताई कोरडे यांनी ५ हजार चौफुट जागा तर निशीकांत डोंगरे व जितेंद्र डोंगरे यांनी ४ हजार चौफुट जागा दान दिलेली आहे. त्यावर तत्कालीन आमदार चरण वाघमारे यांच्या प्रयत्नातुन मुलभुत सुविधा व जनसुविधा या योजनेतुन २० लक्ष रूपयाचे आधुनीक व संगणीकृत इमारतीचे बांधकाम तसेच चरणभाऊ वाघमारे यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन निधीतुन क्रिडा विभागामार्फत ओपन जीम मंजुर करण्यात आलेली होती. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन जि.प.उपाध्यक्ष संदीप ताले , जि.प. सदस्य उमेश पाटील पं.स.सदस्या कौतीकाताई मंडलेकर, ग्रा.पं.जांब सरपंच दिवाकर बोरकर,उपसरपंच विद्याताई लांजेवार, संचालक वि.का.से. सह.संस्था जांब अशोकान बौध्द ,

माजी सरपंच जयप्रकाश दुर्गे , ं माजी जि.प.सदस्य चंदु पिल्हारे, माजी पं.स.सदस्य जगदीश उके, संचालक वि.का.से.सह.संस्था जांब लक्ष्मण फटींग, संचालक वि.का.से. सह.संस्था जांब दिलीप सोमनाथे तंमुस अध्यक्ष रामभाऊ साठवणे , शेतिनिष्ठ शेतकरी दिवाकर पवार, पिटेसुर सरपंच गुरफदेव भोंडे , ग्रा.पं. सदस्य सुधाकर सोमाजी मेश्राम, ग्रा.पं. सदस्य नंदलाल गुलाब लाहोरीया,ग्रा.पं. सदस्य नवरत्न बळवंतरावजी उके, ग्रा. पं.सदस्य क्रिष्णा सिताराम भुजाडे, ग्रा. पं. सदस्या मंजुषाताई -हजयालकराम बोरकर, ग्रा.पं. सदस्य अश्विनीताई युवराज वाघमारे, ग्रा. पं. सदस्य अंकिताताई संदीप बाहे, ग्रा.पं. सदस्य निर्मला चैतराम सिंदपुरे, माजी ग्रा.पं. सदस्य एकनाथ लांजेवार, सामाजीक कार्यकर्ता संतोष मंडलेकर, हरीचंद भुजाडे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लक्ष्मण फटींग यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामविकास अधिकारी डि. डि. सार्वे, लिपीक ग्रा.पं.जांब दिवाकर उके, संगणक आॅपरेटर पंकज लोणारे,पाणीपुरवठा कर्मचारी राजेंद्र बालपांडे शिपाई सुभाष मेश्राम यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *