ग्रेड पे वाढीसाठी ३ एप्रिलपासून नायब तहसिलदार करणार कामबंद आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग-२ संवर्ग यांचे ग्रेड पे वाढविण्यात यावे, या मागणीसाठी दि. ३ एप्रिल २०२३ पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग-२ हे अत्यंत महत्वाचे पद आहे. परंतु नायब तहसिलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग -२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना यांनी नायब तहसिलदार यांचे ग्रेडपे वाढविण्याबाबत सन १९९८ पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही.

तसेच या संदर्भात कोणतीही माहिती शासन स्तरावरुन अद्यापही देण्यात आलेली नाही. नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे रुपये ४८००रु. मंजूर करण्याचे अनुषंगाने शासनाला यापुर्वीही बेमुदत बंदची नोटीस दिली होती. परंतु महसूल प्रशासन (महाराष्ट्र शासन) यांनी यासंदर्भात दखल घेतलेली नाही. तत्कालीन अपर मुख्य सचिव व महसूल मंत्री व वित्तमंत्री यांचेसह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तथापी त्याचीकोणतीही अंमलबजावणी न झाल्याने तसेच के. पी. बक्षी यांचे अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समिती (बक्षी समिती) समक्ष नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे ४८०० रु. वाढविण्याबाबत सादरीकरण करुनही तसेच कामाचे स्वरूप जबाबदारी इ. बाबीची सर्व माहिती असूनही व वारंवार देवूनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही.

अधिक काम अधिक वेतन या नैसर्गिक न्यायतत्वाने व शासनाच्या धोरणानुसार सदर मागणी ही अतिशय रास्त व न्याय असुनही याबाबत शासन स्तरावरून विशेषत: महसूल विभागाकडुन नायब तहसिलदार यांचे वेतन श्रेणीबाबत न्याय मिळाला नाही. त्यामुळे तहसिलदार व नायब तहसिलदारांमध्ये तिव्र असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना पदाधिकारी व सदस्यांची नाशिक मुख्यालयी दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत नायब तहसिलदार हे राजपत्रित वर्ग-२ चे पद असुनही ग्रेड पे व वेतन श्रेणी मात्र इतर विभागातील वर्ग-३ च्या पदाची असल्याने संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी राज्यस्तरीय बैठकीमध्ये मंत्रालयीन महसुल विभाग व बक्षी समिती यांना खंड २ मध्ये नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० रु. करणेबाबतच्या सादर केलेल्या मागणीची दखल न घेतल्यामुळे सदर रास्त व न्याय मागणी मान्य होईपर्यंत एकमताने राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची भूमिका स्विकारण्याचा एकमताने निर्णय संघटनेव्दारे घेण्यात आला असून त्यानुसार दिनांक ०३/०३/२०२३ रोजी सर्व जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनास आंदोलन निवेदन दिले.

दिनांक १३/०३/२०२३ रोजी एक दिवसीय रजा घेवुन सकाळी ११.०० ते १.०० वाजेपर्यंत सर्व विभागीय आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करुन व त्यानंतर सर्व विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. असे टप्पेनिहाय आंदोलन करुन आता दिनांक ३ एप्रिल २०२३ रोजी राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. करिता, महाराष्ट्र राज्य तहसिलदार वनायब तहसिलदार संघटनेने नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० रु. करण्याचे अनुषंगाने के. पी. बक्षी यांचे अध्यक्षतेखालील वेतन त्रुटी समिती (बक्षी समिती) समक्ष केलेल्या सादरीकरणात नमूद केलेल्या बाबींच्या अनुषंगाने तसेच यापूर्वी देण्यात आलेले निवेदनावर तात्काळ निर्गमीत कार्यवाही करून सदरची मागणी मान्य करुन त्या संदभार्तील शासन निर्णय तात्काळ कामबंद आंदोलनापुर्वी निर्गमीत करावे, या संदर्भात योग्य कार्यवाही न झाल्यास दि. ३ एप्रिल २०२३ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा ईशारा निवेदनातून देण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांना निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष नायब तहसीलदार संजय जांभुळकर, कार्याध्यक्ष राजेंद्र निंबार्ते (नायब तहसीलदार) तसेच संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नायब तहसीलदार प्रामख्याने उपस्थित होते. तसेच निवेदनाची एक प्रत खासदार सुनिल मेंढे, आमदार राजु कोरेमोरे, आ. नरेंद्र भोंडेकर, आमदार नाना पटोले यांना देण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *