भंडारा रोड, तुमसर व आमगाव रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे स्टेशन अधिक सुविधायुक्त होवून आधुनिक व्हावे, यासाठी अमृत भारत स्टेशन योजना हाती घेतली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील इतर रेल्वेस्थानकांचेही कायापालट व्हावे, यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांनी प्रयत्न केले. दरम्यान या योजनेच्या दुसºया टप्प्यात भंडारा जिल्ह्यातील वरठी तसेच तुमसर व गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. यानुरूप रेल्वे प्रशासनाने तिन्ही स्थानकांचा कायापालट करण्याचे नियोजनही केले आहे. त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनतेचा रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे. रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन अंतर्गत आॅगस्ट २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरातील १२०० रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याच्या योजना आखण्यात आली. तसेच अंमलबजावणीही सुरू झाली. योजनेच्या पहिल्या टप्प्यात दक्षिण-पुर्वमध्य रेल्वे विभागाच्या नागपूर मंडळातील गोंदियासह पूर्व विदर्भातील काही रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला होता.

यानुरूप गोंदिया रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण व सौंदर्यीकरणाचे काम देखील सुरू झाले आहे. दरम्यान गोंदियासह जिल्ह्यातील तसेच भंडारा जिल्ह्यातील इतर रेल्वे स्थानकही सुविधाजनक व आधुनिक व्हावेत, यासाठी खा. प्रफुल पटेल यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी सतत संपर्कात राहून भंडारा, तुमसर व जिल्ह्यातील आमगाव या रेल्वे स्थानकांना अमृत भारत योजनेत समाविष्ट करवून घेतले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने योजना अंमलबजावणीच्या दुसºया टप्प्यात आमगाव, भंडारा वतुमसर या रेल्वे स्थानकाचा समावेश करून निधी उपलब्ध करून दिला आहे. या तिन्ही रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याच्या उद्देशाने आकर्षक नकाशा देखील तयार करण्यात आला आहे. रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजुला सीटी सेंटर, स्वयंचलित पायरीसह अनेक दजेर्दार कामे व सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहेत. यामुळे खा. प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *