पियकराकडन विवाहितची पताडणा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : लग्ना आधीचे प्रेम प्रकरण पतीस माहीत झाल्याने मारहाण करून प्रताडीत करणारे पतीपासून प्रियकराने घटस्फोट घे मी तुझ्याशी लग्न करतो असे सांगितल्याने पतीस सोडून आलेल्या विवाहितेस मारहाण केल्याने तक्रारी वरून गंगाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोहका येथील फिर्यादी विवाहित महिलेने गंगाझरी पोलीस स्टेशन येथे दिलेले तक्रारीनुसार लग्नाआधी प्रेम संबंध असलेले युवकाने तिला पतीपासून घटस्फोट घे मी तुज्याशी लग्न करतो असे म्हणून लग्न न करता शारीरिक संबंध करून तसेच त्याचे आई-वडीलानी मारहाण केल्याने पिडितेचे तक्रारीवरून गंगाझरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पराग उल्लेवार करीत आहेत.

कोहका येथील रहिवासी २४ वर्षीय पिडितेने गंगाझरी पोलीस स्टेशन येथे दिलेले तक्रारीनुसार तिचे लग्ना आधी कोहका येथील अजय द्रोणाचार्य नागपुरे २५ वर्ष याच्याशी प्रेम संबंध होते मात्र तिचे दुसरे व्यक्तीशी लग्न झाले व लग्नानंतर तिचे पतीस तिचे प्रेम संबंधाबद्दल माहिती झाल्याने तो तिला मारझोड करीत असे. तिचे लग्ना आधीचा प्रियकर अजय नागपुरे याने तू तुझे पतीशी घटस्फोट घे मी तुज्याशी लग्न करतो असे म्हटल्याने पीडितेने पतीचे घर सोडून माहेरी आली असता द्रोणाचार्य नागपुरे याने तिला आपले घरी नेले असता त्याचे आईवडिलांनी घरी ठेवण्यास नकार दिल्यावरून तो तिला भानपुर येथील शेतातील घरात घेऊन गेला व तू इथे माज्यासोबत राहा अन्यथा मी तुज्याशी रीतसर लग्न करणार नाही असे बोलून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध स्थापित केले.दरम्यान पिडीतेशी भांडण करून मी मुंडीपार येथे भाड्याची खोली पाहतो असे सांगून निघून गेला व परत न आल्याने पीडित महिला आपले आईसह त्याचे आईवडिलांचे घरी गेली असता तिला व तिची आईस हितेश नागपुरे ३०, द्रोनाचार्य नागपुरे ६०, गुणी नागपुरे ४५ सर्व रा. कोहका यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पिडीतेच्या तक्रारीवरून गंगाझरी पोलिसांनी भादवि कलम ३७६, ३७६ (१) ३२३, ५०६ नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास उप पोलीस निरीक्षक पराग उल्लेवार करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *