डीजीसीएचे तीन सदस्यीय पथकाचा तपास सुरु

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : बिरसी विमानतळावरुन १८ मार्च रोजी प्रशिक्षणार्थी विमान उड्डाणानंतर बालाघाट जिल्ह्यातील भक्कूटोला जंगल शिवारात कोसळले. या अपघाताच तपास करण्याकरिता महासंचालक नागरी विमान वाहतूकचे (डीजीसीए) तीन सदस्यीय पथक आज सोमवार, २० मार्च रोजी घटनास्थळी दाखल झाले. त्यांचा तपास सुरु असून तपासाअंती अपघाताचे कारण पुढे येणार आहे. गोंदियाच्या बिरसी विमानतळावरील इंदिरा गांधी राष्ट्रीय उड़ान अकादमी रायबरेली केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमानाला शनिवारी अपघात झाला. हे विमान दोन डोंगरामधील १०० फूट खोल दरीत कोसळले होते. यात प्रशिक्षक वैमानिक मोहित ठाकूर रा. चंबा, हिमाचलप्रदेश व महिला प्रशिक्षणार्थी वैमानिक व्ही. माहेश्वरी, रा.कच्छ, गुजरात यांचा दुदैर्वी मृत्यू झाला.

घटनास्थळ हे अतिनक्षलसवेंदनशिल असल्याने मध्यप्रदेश पोलिसांच्या हाँक फोर्स व स्थानिक पोलिसांच्या कोंबीग आॅफरेशननंतर घटनास्थळापर्यंत पोचून प्रशिक्षणार्थी वैमानिकांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. प्रत्यक्ष घटनास्थळावर पोचण्याकरीता पोलिस व गोंदिया विमानतळाच्या तपासणी चमूला ७ किमीचा डोंगराळ रस्ता व जंगलातून पुर्ण करावा लागला. मृतक वैमानिकांचे मृतदेह त्यांच्या कुटूंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, या अपघाताचा तपास करण्याकरिता रविवार, १९ मार्च रोजी डीआरसीएची तीन सदस्यीय पथक गोंदियात दाखल झाले. या पथकाने प्रशिक्षण केंद्रातील व्यवस्थापक, अन्य विमान प्रशिक्षक व तांत्रिक विभागातील अधिकाºयांशी चर्चा केली. आज, २० मार्च रोजी डीआरसीएचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात केली आहे. हा तपास मंगळवार,२१ मार्च रोजी सुरु राहणार असून पथकाचा अहवाल आल्यानंतरच अपघाताचे कारण सांगता येणार असल्याचे बिरसी विमानतळाचे व्यवस्थापक शाफिक शाह यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.