नागरी समस्यांना घेऊन ‘डोन्ट वरी ग्रुप’ चा पवनी न.प.वर मोर्चा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पवनीतील नागरी समस्यांनी नागरिकांना त्रस्त केलेले असून अजूनही नगरपरिषद प्रशासनातर्फे कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाहून डोन्ट वरी ग्रुप तर्फे येणाºया २८ जुलै २०२३, रोज शुक्रवार ला नगरपरिषद वर जन आंदोलनाच्या माध्यमातून महामोर्चा काढण्यात येणार आहे. पवनी नगरपरिषद सर्वात जुनी नगरपरिषद म्हणून ओळखली जाते पवनी हे प्राचीन शहर म्हणून व विदभार्ची काशी म्हणून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तरीसुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुका लांबणीवर असल्याने लोकप्रतिनिधीचे कार्य संपुष्टात आलेले आहे त्यामुळे पवनी नगरपरिषद वर प्रशासकाचे राज्य आहे ते असताना सुद्धा पवनी नगरपरिषद मध्ये अनेक समस्या आहेत त्यामध्ये शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर स्मारक, जलशुद्धीकरण केंद्र, २४ तास पाण्याची व्यवस्था, गडर लाईन, असे अनेक प्रोजेक्ट पवनी मध्ये सुरू असताना रस्ता फोडून त्याच्या माध्यमातून अंडरग्राउंड पाईप टाकण्याचे काम सुरू आहे परंतु कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे व प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळे पाईप्स टाकल्यानंतर त्या गड्ड्यांना सोयीस्कर न बुजविता तसेच ठेवण्यात येत आहे त्यामुळे चिखलाचे प्रमाण वाढलेले आहे व याआधी २४ तास पाण्याच्या संदर्भात पाईपमुळे अख्या उन्हाळ्यात पवनीचा लोकांना धुळीच्या त्रास करावा लागला होता

यासंदर्भात वारंवार याबद्दल विचारणा आणि सांगणे होत असताना सुद्धा प्रशासनाची याकडे दुर्लक्ष आहे . सोबतच पवनी शहरामध्ये चोरीच्या घटना सुध्दा वाढत आहेत त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे या मागण्यांसाठी अनेकदा निवेदन देण्यात आलेली आहेत परंतु अजूनही त्या संदर्भात कुठलीही उपाययोजना झालेली नाही पवनीचे वीर पुत्र शहीद मेजर प्रफुल्ल मोहरकर हे देशासाठी शहीद झाले त्यांच्या नावाने पवनी शहराच्या बाहेर हायवे रोडला शहीद स्मारक बांधण्यात आलेले आहे परंतु शहिदाच्या नावाने बांधण्यात आलेल्या स्मारकाकडे सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष असून येणाºया जाणाºया लोकांना ते स्मारक खंडर म्हणून दिसतंय त्यामुळे गावाचा आणि वीर पुत्राचा सुद्धा अवमान होताना दिसून येत आहे. पवनी शहरातील गड्डे बुजवणे त्यांनतर शहरामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावणे, शहीद स्मारकाचे सौंदरिकरण करणे, मोक्षधाम वाईट परिस्थितीवर लक्ष घालावे.

प्रशासनाने वार्ड निहाय अधिकाराची नेमणूक केलेली नाही त्यामूळे दैनंदिन जीवनात येणाºया नागरी समस्यांबाबत नागरिकांनी कुठे आपल्या समस्या मांडाव्यात याचा प्रश्न नागरीकांना येतो आहे त्यामुळे अनेकदा या संदर्भात डोन्ट वरी तर्फे लक्ष देण्याचे सांगण्यात आले परंतु त्याकडे प्रशासनात तर्फे दुर्लक्ष करण्यात आले. मोक्षदामाचीसुध्दा वाईट परिस्थिती आहे त्याकडे सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. महामोर्चासाठी जनजागृती व्हावी या साठी प्रत्येक वॉर्डात बैठका सुरू असून सिग्नेचर कॅम्पेन द्वारा नागरिकांना मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे सिग्नेचर कॅम्पेनला व वार्डाच्या मिटींगला नागरिकांच्या भरघोस प्रतिसाद मिळत आहे समस्या प्रशासनाच्या नजरेत आणून काम तात्काळ झालेच पाहिजे या मागणीसाठी २८ तारखेला डोन्ट वरीच्या नेतृत्वात डोन्ट महामोर्चा काढण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यात सहभागी व्हावे असे डोन्ट वरी ग्रुप पवनी च्या माध्यमातून वार्ड मीटिंग द्वारे सांगण्यात आलेले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *