रोवणी आटोपली अन् विद्युत खांब कोसळले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: जिल्हात मुसळधार पावसाचे आगमन झाले आणि शेतकरी वर्ग सुखावला. शेतात येणारे पºहे डोलु लागले व शेतकरी वर्ग धान रोवणीसाठी सज्ज झाला. अशातच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, उपकेंद्र मानेगाव अंतर्गत येणाºया सिल्ली येथील शेतक-यांच्या शेतातील रोवणी आटोपली आणि काही वेळातच विद्युत खांब कोसळले. मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे विशेष. विद्युत खांब कोसळल्याने विद्युत विभागाचा भोंगळ कारभार रस्त्यावर आला आहे. परिणामी त्या परिसरातील विद्युत पाच दिवसांपासुन खंडित करण्यात आलेली विद्युत पुर्ववत सुरू करून विद्युत अभावी खोळंबलेली रोवणी पुर्ण होण्यास मदत होईल. याकडे विद्युत विभागाने जातीने लक्ष द्यावे व संबंधित अधिकारी तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी सिल्ली येथील शेतकºयांनी केली आहे. प्राप्त माहिती नुसार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ, उपविभाग मानेगाव अंतर्गत येणाºया सिल्ली येथील शेतकºयांच्या शेतावर नवीन कनेक्शन देण्यासाठी वाढीव खांब (पोल) उभे करण्यात आले होते.

या संदर्भातील कामाची जबाबदारी ठेकेदार मूलचंदानीयांना देण्यात आली असल्याचे शेतकºयांनी सांगितले. स्मशानभूमी परिसरातील शेतकरी विनोद तिडके, ईस्तारी मस्के, सखाराम मस्के, भूदेव क्षीरसागर, जितेंद्र क्षीरसागर, गुड्डू क्षिरसागर यांच्या शेतातून इलेक्ट्रिक (पोल) खांब नेण्यात आले आहे. पण ते खांब दीड ते दोन फूट खड्डे खोदून पोल लावण्यात आले. तसेच त्या खड्डयात कोणतेही दगड न टाकता किंवा सिंमेट काँक्रेट न घालता मातीने बुजवण्यात आले. आणि वरून फक्त सिमेंट काँक्रेटचा मुलामा चढविण्यात आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात काही फरक पडत नाही. मात्र पावसाळा सुरू झाला की जमिनीत पाणी मुरत असते. आणि ती जागा मऊ होत असते. हे अशिक्षित, अडाणी माणसाला समजते.

मात्र विद्युत विभागात नौकरीला असणाºया अभियंत्याला का कळत नाही. हे समजण्यापलिकडेच आहे. सध्या शेतकºयांच्या शेतात रोवणीची कामे युध्द पातळीवर असतांना पंधरा ते विस मिनीटाच्या नंतर खांब (खाली) जमिनीवर म्हणजेच शेतात कोसळल्याने दुर्दैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. आणि कदाचित शेतकरी व मजूर वर्गाची जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असता? असा प्रश्न शेतकºयांनी विचारला आहे.संबधित ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे व मानेगाव विद्युत विभागातील अभियंत्याच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला असता. विद्युत खांब कोसळल्याने विद्युत विभागाचा भोंगळ कारभार रस्त्यावर येऊन पितळ उघडे पडले आहे. यापुढे शेतकरी वर्गाची कोणत्याही प्रकारची जीवितहानी व शेतकºयांचे नुकसान होणार नाही. तसेच पडलेले खांब त्वरित उभे करून विद्युत प्रवाह नियमित करण्यात यावा. जेणे करून विद्युत अभावी खोळंबलेली रोवणी पुर्ण होण्यास मदत होईल. याकडे विद्युत विभागाने जातीने लक्ष द्यावे व संबंधित अधिकारी तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी विनोद तिडके, ईस्तारी मस्के, सखाराम मस्के, भूदेव क्षीरसागर, जितेंद्र क्षीरसागर, गुड्डू क्षीरसागर व परिसरातील शेतकºयांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *