भंडारा शहरात छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव थाटात साजरा होणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : एका हातात शस्त्र आणि दुस-या हातात लेखणी घेऊन इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळात युवकांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट करणा-या शिवपुत्र छत्रपती शंभूराजांचा जन्मोत्सव सोहळा. छत्रपती संभाजी महाराज रयतेला तळहाता प्रमाणे जपणारे ‘कर्मवीर’ होते, धर्माभिमान असलेले ‘धर्मवीर’ होते, महापराक्रमी ‘शूरवीर’ होते, शिवरायांनी निर्माण केलेल्या ‘स्वराज्याचे रक्षक’ होते. स्वराज्याचे धाकलेधनी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा यावर्षी सुध्दा १४ मे ला भंडारा शहरात थाटात साजरा होणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त १४ मे रविवार ला शहारातील छ. शिवाजी महाराज स्मारक, शुक्रवारी येथे ‘महाराष्टातील प्रसिद्ध युवा शिवशाहीर प्रा. अरविंद घोगरे पाटील’ यांच्या शाहिरी बाणा पोव-कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. छत्रपतींचा गौरवशाली इतिहास शिवशंभू प्रेमी, विद्यार्थी व नागरिकांनपर्यंत पोहचावे आणि यातून प्रेरणा घेऊन भविष्यात सज्जन नागरिक घडावे यासाठीच हा विचारांचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. प्रा. घोगरे यांचापोवाडा भंडारा शहरातील शिवशंभु प्रेमींना नवी ऊर्जा देईल, नवा विचार देईल.

करीता छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा जल्लोष, रोषणाई करून थाटात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सामाजिक, शैक्षणीक, क्रिडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सत्कार देखील करण्यात येईल. या सोहळ्यासाठी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी राज्यमंत्री नाना पंचबुधे, माजी आमदार चरण वाघमारे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. पल्लवी डी. खोंडे प्रामुख्याने उपस्थित असतील. या नेत्रदीप सोहळ्याला विद्यार्थी, नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठान च्या पदाधिकाºयांनी केले आहे. जन्मोत्सव सोहळ्याच्या आयोजनासाठी छत्रपती श्री. संभाजी महाराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत असून शिवशंभू प्रेमी व नागरिकांचे सहकार्य लाभत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.