कोतवाल भरतीची उत्तरेच बाहेर, तिघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : झालेल्या कोतवाल भरती तालुक्यात कोतवालांची भरती करण्यासाठी प्रक्रिया राबवली गेली. प्रक्रियेत चक्क उत्तरांचे स्क्रीनशॉट घेऊन ते इतरत्र पाठविण्यात आले. या प्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कोतवाल भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने घेतली जावी अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. २८ मे रोजी लालबहादूर शास्त्री विद्यालयच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील एका लिपिकाच्या मोबाईलवर उत्तराचे स्क्रीन शॉट असलेला फोटो पोहोचला. याचीं त्यांनी तहसीलदारांना दिल्यानंतर तहसीलदार अरविंद हिंगे यांनी या संपूर्ण प्रकरणाची गोपनीय आणि सखोल चौकशी केली.

आपल्या सहकाºयांच्या मदतीने नियोजनबद्ध प्रयत्न करून शासनाचीफसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून पोलिसांनी परीक्षार्थी चेतन बावनकुळे, त्याचा चूलतभाऊ राहूल बावनकुळे, अरविंद घरडे सर्व रा.परसोडी यांना अटक केली असून एकजण फरार आहे. फरार असलेल्या अरविंद धरणगाव याचा शोध घेतला जात असल्याचे समजते. दरम्यान पेपर फुटीचा हा प्रकार पुढे आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात काही नागरिकांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेत संपूर्ण कोतवाल भरती प्रक्रियेत रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पेपर फुटी प्रकरणाचा किती लोकांनी लाभ घेतला असेल हे आज सांगणे कठीण असल्याने प्रक्रिया वादाच्या भवºयात सापडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेवरून वरून तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांच्या संदर्भात अनेक आरोपही केले गेले होते.

कोतवाल भरती प्रक्रियेतील गैरप्रकारात निमेश गेडाम यांचा कोणताही संबंध नाही भंडारा : भंडारा तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याबाबत दिनांक ८ जून २०२३ रोजी विविध वृत्तपत्रामध्ये लिपीकाच्या मोबाईलवर उत्तराचा स्क्रिनशॉट असे वृत्त प्रकाशित झाले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक निमेश गेडाम यांचे नावही प्रकाशित करण्यात आले. कोतवाल भरती प्रक्रियेतील गैरप्रकारात निमेश गेडाम, लिपिक यांचा कोणताही संबंध नाही, उलटपक्षी त्यांचे सतर्कतेमुळे सदर प्रकार उघडकीस आला आहे, असे भंडारा तहसीलदार तथा सदस्य सचिव कोतवाल भरती-२०२३ यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *