विर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे बलिदान दिनानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : दि.९ जून रोजी विर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचे बलिदान दिनानिमित्त प्रत्येक तालुक्यात आरोग्य शिबिर घेण्याचे निर्देश जिल्हास्तरावरुन प्राप्त झाले होते . त्या अनुषंगाने अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मौजा गंधारी येथे पोलिस विभाग व आरोग्य विभागाच्या एकत्रित सहकार्याने जनजागृती व आरोग्य शिबिर यशस्वी पार पडले. आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथील चमुने सहभाग घेतला. सद्यस्थिती शासन आपल्या दारी विविध महत्त्वाचे कार्यक्रम, उपक्रम व योजनांची माहिती गावोगावी पोहोचण्याचा विडा सर्व विभागांनी घेतला आहे. त्याचे औचित्य साधुन विर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगाव येथील चमूने मौजा गंधारी येथे जनजागृती स्टॉल लावून आरोग्य विभागाअंतर्गत विविध लोकाभूमिक योजनांची माहिती जशी जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जननी शिशु सुरक्षा योजना ,मानव विकास कार्यक्रम, नवसंजीवनी मातृत्व अनुदान योजना इ.बाबत माहिती देण्यात आली तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत विविध आजारांवरील प्रतिबंधात्मक उपाययोजनाची माहिती बॅनरच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

सदर कार्यक्रम पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांच्या एकत्रित वतीने तपासणी व जनजागृतीची यशस्वी पार पडले. पोलीस विभागामार्फत पोलीस उपनिरीक्षक प्रताप बागड व इतर पोलीस कर्मचारी,सशस्त्र दुरक्षेत्र व बेस कँपचे अधिकारी व पोलीस यांनी सहभाग घेतला तर आरोग्य विभागामार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र गोठणगावचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. आरती महिंद, आरोग्य सहाय्यक संतोष पारधी, आरोग्य सेवक समीर सैय्यद, आरोग्य सेविका प्रमिला रॉय, आशा सेविका अहिल्या इस्कापे ,आशा गट प्रवर्तक रवीना टेंभुर्णे, वाहन चालक शशिकांत खेडेकर यांनी मोलाची भूमिका निभावली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *