मोफत भव्य नेत्र व रोग निदान शिबिर संपंन्न

गोबरवाही : खासदार सुनील मेंढे, माजी पालकमंत्री परिणय फुके, चिचोली गावातील बलहिरा भवन येथे राष्ट्रसंत तुकडोंजी महाराज बहुउद्देशीय संस्था चिचोली व लाल स्वस्तिक सोसायटी शाखा तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य सभापती रमेश पारधी यांच्या मान्यवर उपस्थितीत मोफत भव्य नेत्र व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री डॉ. विकास महात्मे नेत्र रुग्णालय, नागपूरचे नेत्रतज्ञ डॉ. अरविंद डोंगरवार यांच्या पथकाने २७३ लोकांच्या डोळ्यांची तपासणी केली, १२३ जणांची मोतीबिंदू आॅपरेशनसाठी निवड करण्यात आली. नागपूरच्या महात्मे हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया होणार, १९३ जणांची बीपी तपासणी, शुगर व औषधे देण्यात आली. ३४ जणांना सिकलसेल आढळून आल्याने त्यांना औषधही देण्यात आले.

दंतचिकित्सक डॉ.विवेक बर्डे यांनी ५६ जणांच्या दातांवर उपचार केले, ६२ जणांच्या मते नंबर ला चष्मे मोफत वाटप डॉ.हरेंद्र रहांगडाले व बनवारीलाल मोर यांच्या सौजन्याने करण्यात आले, एकूण ५५६ जणांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला, डॉ.हिमांशु रहांगडाले, गौरव कात्रे, स्वाती कात्रे, वसंत झोडे महादेव दुरुगकर, अकरलाल पटले, कुंडलिक आगाशे, गोबरवाही आरोग्य केंद्राने शिबिराच्या यशस्वितेसाठी उल्लेखनीय सहकार्य केले. शिबिराचे संचालन रेड स्वस्तिक सोसायटी तुमसर शाखेचे अध्यक्ष श्रीलाल बमनोटे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *