गायमुख देवस्थानात उभारणार ३१ फूट उंच शिव शंभूची मुर्ती

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गायमुख हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र असुन हे तीर्थक्षेत्र सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. तिथे अत्यंत पवित्र भगवान शिवाचे मंदिर आहे. हे देवस्थान हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आणि लहान महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. हे स्थान गट ग्रामपंचायत आंबागड येथील रामपुर हमेशा च्या हद्दीमध्ये मध्ये येत आहे. या स्थळाचे महत्त्व असे की पहाडाचे पाणी, पर्वतीय झरा सतत वाहून गाईच्या मुखातून एका जलकुंभात पडते, यावरून या स्थळाचे नाव गायमुख असे पडले आहे. गाईच्या मुखातुन पडणाºया या जलधारेच्या खाली भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने स्नान करतात. येथील पंचमुखी ज्योतिर्लिंग भोलाशंकराचे मंदिर भारतातील विद्यमान १८ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. पाय-या चढून भाविक पहाडावर पोहचतात याला “चौ-यागड” असे म्हणतात.

भक्त चौ-यागडावर जातात, पूजा करतात. व तिथून माता पार्वतीच्या कोपापर्यंत जातात. गायमुख हे स्थान भंडारा नागपूर व मध्य प्रदेशातील बालाघाट, व शिवनी जिल्ह्यांना लागून आहे त्यामुळे महाशिवरात्रीच्या वेळेला या ठिकाणी पोहा घेऊन दोन्ही राज्यातील भक्त लाखोच्या संख्येने येतात. गायमुख येथुन फक्त १० कीमी. अंतरावर राजीव सागर धरन व फक्त ५ कीमी अंतरावर आंबागड येथे ऐतिहासिक गोंडराजे बक्त बुलंदशहा यांचा किल्ला आहे, त्यामुळे पर्यटकांची वर्दळ निश्चितच वाढेल. तरी स्थानिक प्रशासनाने या स्थानाला प्राप्त असलेला अनन्य साधारण महत्व लक्षात घेवुन ज्यादतीने नियोजन करावे लागेल. याठिकाणी व्यवस्था व सौंदर्यीकरण यावर लक्ष देणे गरजेचे आहे, त्यामुळे स्थानिक फडापेन पेनठाणा चॅरिटेबल ट्रस्ट गायमुख यांनी चौरागड व शिवमंदिर याला लागून वर टेकडीवर ३१ फूट उंच शिवशंभू ची मूर्ती स्थापन करण्याचे ध्येय निश्चित केले आहे व या संदर्भात जिल्ह्यातील सर्व रहिवासी, पदाधिकारी,प्रशासन व शिवभक्त ह्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिव शंभू ची भव्य मूर्ती स्थापन झाल्याने निश्चितच शिवभक्तांमध्ये उत्साहाचे संचार होईल पर्यटन वाढेल व त्याचा फायदा क्षेत्रातील लोकांच्या शाश्वत रोजगाराच्या संध्या निर्माण झाल्याने होईल, ही संभावना वर्तविली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.